संगमनेर । झुंझार न्यूज 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील निवृत्त इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. त्रिंबक राजदेव यांचे चिरंजीव डॉ. गणेश त्रिंबक राजदेव यांनी इतिहास विषयामध्ये यशस्वी संशोधन पूर्ण केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी प्रदान केली आहे.

डॉ गणेश राजदेव हे संगमनेर येथील रहिवासी असून त्यांनी इंग्रजी विषयांमध्ये पदवी मिळवली आहे. याचबरोबर इतिहास विषयांमध्ये पदवीत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून बीएड पूर्ण केले आहे. संगमनेर नगरपालिका 160 वर्षापूर्वीची ऐतिहासिक असून  ” संगमनेर नगरपरिषद : एक ऐतिहासिक अभ्यास” (इ. स. १८६० ते २०११) या विषयावर आधारित त्यांनी संशोधन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत पूर्ण केले.
त्यांच्या संशोधन कार्याला मार्गदर्शक डॉ. दिगंबर सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संशोधनादरम्यान त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन लेख प्रकाशित केले आहेत.

संगमनेरच्या साहित्य संशोधन या विषयाबरोबर इतिहास संशोधन मंडळात देखील ते कार्यरत आहेत. डॉ. त्रिंबक राजदेव यांच्या सामाजिक व ऐतिहासिक कामाचा आदर्श घेऊन त्यांनी या विषयात संशोधन केले आहे.


त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात , नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, प्रा डॉ. त्रिंबक राजदेव, प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, शांताराम डोंगरे, तसेच राजदेव कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *