कोपरगाव : झुंजार न्यूज                              महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेल्या संशोधन आढावा बैठकीत संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय महाविद्यालय कोल्हापूर येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. आर. सूर्यवंशी, कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.बी.हीले, प्राचार्य डॉक्टर जी.के.ससाणे, संख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आर.जी.वाणी आदींच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर येथील प्रा. अविनाश रत्नपारखे यांच्या३८ वर्षे प्रदीर्घ सेवा कालावधी सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
                                                               कृषी संशोधनात राज्यातील सर्वच कृषी विद्यापीठाबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. ३८ वर्ष सेवा कालावधीत अनेक कृषी संशोधना संदर्भात विद्यार्थ्यांबरोबरच थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम करता आले हा मनस्वी आनंद असून सेवापुर्तीनंतरही या कार्यात आवश्यक तेथे माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून शेतकऱ्यांची उन्नती, कृषी उत्पादन वाढ अधिकाधिक कशी होईल यासाठी काम करू असे सत्कारास उत्तर देताना प्रा. अविनाश रत्नपारखे म्हणाले. यानंतर त्यांनी कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य देवस्थानला भेट दिली तेथेही त्यांचा सत्कार करण्यात आला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *