संगमनेर : झुंजार न्यूज                                 विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर संशोधनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या अमृतवाहिनी फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय पातळीवरील अमृत फार्माथान 2023 ही संशोधन स्पर्धा संपन्न झाली असून या स्पर्धेत सात विद्यापीठातील 30 महाविद्यालयातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला

अमृतवाहिनी कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय स्तरावरील अमृत फार्माथान 2023 ही संशोधन परिषद इंटरनॅशनल कॉलेज व असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल टीचर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. यावेळी एन व्ही फार्मासिटिकल सिन्नर कंपनीचे संचालक नरेंद्र हेगडे, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, प्राचार्य डॉ एम.जे. चव्हाण ,प्रा. गिरीश त्रिवेदी, प्रवीण कुमार शर्मा, योगेश कडू, अमोल मोरे ,डॉ दिनेश हासे, डॉ. सादिक सय्यद ,डॉ विशाल मोरे, डॉ दीपक राऊत, महेश देशपांडे, देशराज चुंबळे आधी उपस्थित होते..

यावेळी बोलताना हेगडे म्हणाले की ,काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आ. डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाबरोबर संशोधनाची मोठी सुविधा निर्माण करू दिली आहे. संशोधन व नवनिर्मिती हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयोगशील राहिले पाहिजे

सौ शरयूताई देशमुख म्हणाल्या की, अमृत फार्म 23 ही संशोधन स्पर्धा अमृतवाहिनीतील विद्यार्थ्यांबरोबर इतर सर्व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या संशोधनात भर टाकणारी आहे.

या स्पर्धेत पदवी पातळीवरील पहिले बक्षीस पारनेरच्या अभिषेक पांगे  व चंद्रकांत घंगाळे यांनी पटकावले. तर अमृतवाहिनी च्या वैष्णवी वाघ व गौरी हळनोर यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. संजीवनीच्या श्रुती कांबळे व श्रुती कानडे आणि स्मिता ठाकरे यांनी तिसऱ्या क्रमांक मिळवला. तर मालेगाव फार्मसी कॉलेजचे जयेश पाटील , चैताली मार्कंड यांनी चतुर्थ क्रमांकाची पारितोषिक मिळवले .

फार्मासुटीकस विषयात पदवी तर पातळीवर एम इ टी इन्स्टिट्यूट फार्मसीच्या शितल गोसावी ने प्रथम क्रमांक पटकावला तर डी वाय पाटील फार्मसी च्या प्रिया रोडगे व नाशिकच्या माधुरी देशमुख यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर अमृतवाहिनीच्या निकिता राठोड व देवांश गोसावी यांनी तृतीय क्रमांक मिळावा. फार्मासिटिकल केमिस्ट्री विषयात केबीएच इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मालेगाव चे मनोज शेजवळ आणि प्रथम क्रमांक मिळवला तर अमृतवाहिनीच्या मानसी दिघेने द्वितीय क्रमांक मिळावा

या स्पर्धेत एकूण एक लाख रुपयांची रोख पारितोषिक वितरित करण्यात आली .

या स्पर्धेच्या यशस्वी  आयोजनाबद्दल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, मा आ. डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,इंद्रजीत भाऊ थोरात मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक प्रा व्ही बी धुमाळ ,प्राचार्य डॉ एम.जे .चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *