या तंत्रज्ञान युगात पुस्तकी ज्ञानापेक्षा डिजिटल ज्ञानाकडे मुलांचा कल वाढू लागल्याचे दिसून येत आहे मात्र दिन – दुबळे , गोर – गरिब , आदिवाशी , मागसवर्गियांतील मुलांना तत्रज्ञान शिक्षणाची आवड असताना बिकट परिस्थितीत केवळ पुस्तकी ज्ञानात समाधान मानावे लागते मात्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाव पातळी वरील शाळेची परिस्थिती ओळखून आपल्या विशेष निधी मधून virtual ( विरटूल ) डिजिटल बोर्डे जिल्हा परिषद शाळेना देवू केले .
पानोडीतील गावठाणातील जिल्हा परिषद शाळेस दोन लाख साठ हजाराचे virtual डिजिटल बोर्डचे ऊद्धाटन जेष्ठ कार्यक्रते नानासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी रावसाहेब घुगे , राजुभाऊ जाधव , रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब कदम ,युवा कार्यकर्ता नानासाहेब कदम , जिवनभाऊ कदम , ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव , ग्रामपंचायत सदस्य,रंगनाथ मुँढे, शाळा कमिटीचे अध्यक्ष संतोषभाऊ चव्हाण, दक्ष पालक गणेश कैलास नागरे , वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आयाजभाई आशरफी , सामाजिक कार्यकर्ते. भारतभाऊ शेवाळे , मुख्याध्यापक नागरे , गाडेकर आदीसह पालक विदयार्थी उपस्थित होते
