12 विद्यार्थ्यांना 81 च्या पुढे पर्सेंटाइल

 



संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील 12 विद्यार्थ्यांना 81% च्या पुढे पर्सेंटाइल मिळाले असून एमएच-सीईटी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली असल्याची माहिती प्राचार्य आशिष कुमार यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी, प्राचार्य आशिष कुमार ,प्रा.उदय कर्पे गुरव उपस्थित होते.

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात मा. आ. डॉ सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजने कायम उच्च निकालाची परंपरा राखली आहे. यावर्षी बारावीचा निकाल उत्कृष्ट लागला असून इंजिनिअरिंग व मेडिकल साठी असलेल्या एमएच-सीईटी परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोठे यश मिळाले आहे यामध्ये पीसीएम इंजिनिअरिंग साठीच्या गटामधून इजहान अरीफ शेख 93.13% ,अशिता आशिष कुमार 92.60% ,साईश श्रीनिवास सोनकर 87.73%, नितीन भागवत गावित 86.84% कल्याणी विनोद शिंदे 86.59% तर पीसीबी फार्मसी च्या ग्रुप साठी शिप्रा मनोज देवडे 93.10% , मीफ्राह मुस्ताक शेख 85.76% ,श्रद्धा संदीप सोनवणे 84.82%, हर्षदा पोपट गुंजाळ 83.24% ,मोहम्मद सीमा असिफ बागवान 83.17% ,तनिष्का दीपक शिंदे 81.83.% आणि स्नेहल भाऊसाहेब गुंजाळ 81% यांनी यशस्वी कामगिरी नोंदवत संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले

या सर्व विद्यार्थ्यांचा संस्था कार्यालयात सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल लोकनेते बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, व्यवस्थापक प्रा व्ही.बी धुमाळ प्राचार्य आशिष कुमार प्रा. उदय करपे यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *