कोपरगांव । झुंझार न्यूज

अहमदनगर जिल्हा पोलीस आयोजित जागर रिल महोत्सवात ड्रीम सिनेमा प्रॉडक्शन यांनी सादर केलेल्या रिलला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

             

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी महिला अत्याचार या विषयावर जागर स्पर्धा घेतली त्यात संवत्सरचे किरण उहाळे (नेवासा) यांनी त्यांचे चिरंजीव प्रणव डहाळे, निर्माता विनोद बनकर, किरण डहाळे, दिनेश सरगय्ये, नितीन धुमाळ, सिद्धार्थ नागपुरे, उमेश डहाळे यांनी जनजागृती साठी बनवलेला रिल सर्वोत्कृष्ट ठरला त्यांना द्वितीय क्रमांकाचे प्रशस्तीपत्रक देण्यांत आले.

           

जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यावेळी बोलतांना म्हणाले की, अथक परिश्रम, जिद्द आणि संयम यांची साथ असेल तर यशाला तुमच्या पायाशी नतमस्तक व्हावेच लागते.आज सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे ते कमी करण्यासाठी सर्वांनी सांघीक प्रयत्न करावे.

           

याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, जिल्हा पोलीस उपाधिक्षक डॉ. दिलीप टिपरसे, अहिल्यानयर सायकलींग क्लबचे संस्थापक गौरव फिरोदिया व जिल्हाभरातील अन्य कलाकार उपस्थीत होते. निर्माते विनोद बनकर यांनी आभार मानले. प्रणव डहाळे व त्यांच्या टीमने पूर्वीही मोठ्या प्रमाणात सामाजिक विषयावर रिल तयार करून समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या रीलला जिल्हाभरातून तसेच राज्यस्तरावर मोठा प्रतिसाद मिळत आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *