लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विद्यमान सरपंच सौ. अलका ताई बापूसाहेब गायकवाड आणि सन्माननीय बापूसाहेब गायकवाड यांनी सुमारे ७५ हजार रुपये किमतीची अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा भेट दिली.
विद्यालयातील सुमारे १२०० विद्यार्थ्यांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून गायकवाड दांपत्याने स्वखर्चाने ही जलशुद्धीकरण यंत्रणा विद्यालयात बसवून दिली. या यंत्रणेतून स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गायकवाड कुटुंबीयांच्या या दानशूर कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि शैक्षणिक विकासासाठी सरपंच सौ. अलका ताई गायकवाड नेहमीच पुढाकार घेत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
या उदात्त दातृत्वाबद्दल विद्यालयाच्या वतीने प्राचार्य सयराम शेळके आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.देविदास दाभाडे यांच्या हस्ते गायकवाड दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका शिक्षण संचालिका लीलावती सरोदे यांनी या उपक्रमाचे यांनी अभिनंदन केले आहे.