सायं.6 ते 9 या वेळेत लोड शेडिंग बंद करा– डॉ जयश्रीताई थोरात

संगमनेर । झुंझार न्यूज

 

सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे .त्यातच वीज वितरण विभागाने सुरू केलेल्या लोड शेडिंग मुळे सर्वत्र मोठी नाराजी वाढली असून ग्रामीण भागासह शहरातील विद्यार्थी व महिला त्रस्त आहेत. वीज वितरण विभागाने सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत कोणतीही लोड शेडिंग न करता पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरूच ठेवावा या मागणीसह वीज वितरण विभागाच्या गलथान कारभार विरोधात काँग्रेसने आज आक्रमक धोरण घेतले.

महावितरण कार्यालयात आज काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले यावेळी सौ दुर्गाताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शरद नाना थोरात, बुवाजी बाबा पुणेकर,कैलास पानसरे, रमेश गुंजाळ ,शिवाजी जगताप, विठ्ठल गुंजाळ, नरेंद्र गुंजाळ सिताराम राऊत, योगेश पोकळे, प्रभाकर गुंजाळ ,रामकृष्ण लांडगे, संदीप डोंगरे ,सौ शकुंतला सोसे, रामेश्वर पानसरे ,भारत शेलकर ,दत्तू कोल्हे, शिवाजी खुळे, अलोक बर्डे ,उज्वला राहणे ,सौ शीतल हासे ,सदाशिव हासे, निखिल पापडेजा , शेखर सोसे,रवींद्र गिरी ,वैष्णव मुर्तडक ,राजू खरात, दत्तू कोकणे, तात्या कुटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर शहर व तालुक्यामध्ये दररोज सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत लोड शेडिंग केली जाते. यामुळे अंधार पडत असताना विद्यार्थी घरी येण्याची वेळ असते .याच काळामध्ये हिंस्र प्राणी  विद्यार्थ्यांवर हल्ले करतात. त्यापासून त्यांना मोठा धोका निर्माण होतो. याचबरोबर घरी आल्यानंतर लोड शेडींग मुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही तसेच शेतकरी बांधवांना दूध काढणे गाई गोठ्याची साफसफाई करणे अशी अनेक कामे याच काळात करावी लागतात त्यामुळे या काळामध्ये कोणतीही लोड शेडिंग करू नये अशी मागणी त्यांनी केली

सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, येणारा काळ हा सणासुदीचा आहे गणपती उत्सव, देवीचा उत्सव या सर्व काळामध्ये नागरिक मोठे आनंदी असतात मात्र लोड शेडिंग केल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडते सरकारची जबाबदारी आहे सरकारने वेळेत लाईट दिली पाहिजे. पूर्ण वेळ व पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की या सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. महायुतीचे सरकार हे फक्त घोषणाबाजी करत असून मोफत पूर्णवेळ व पूर्ण दाबाने राज्यभरात लाईट त्यांनी दिली पाहिजे. मात्र लोड शेडिंग करून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याचे काम हे सरकार करत आहे.

तर अजय फटांगरे म्हणाले की सरकारच्या योजना फसव्या असून तरुणाई आता रस्त्यावर उतरली आहे. केंद्र व राज्य सरकार फक्त खोट्या घोषणा करत आहे. महागाई बेरोजगारी वाढली आहे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी धर्माचे आणि जातीचे राजकारण केले जात आहे. आता विकासाचे राजकारण गरजेचे असून वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा रस्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी गोरक्षनाथ सातपुते ,शबीर तांबोळी ,सागर सोनवणे, श्रीकांत सांगळे, राधाकिसन नेहे ,सतीश वर्पे, यांच्यासह विविध कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महावितरण कार्यालयाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी दिली

पूर्ण दाबाने वीजपुरवठा सुरळीत करा



शहर व ग्रामीण भागामध्ये सायंकाळी 6 ते 9 या वेळेत लोड शेडिंग केले जाऊ नये. तसेच सर्वांना पूर्ण दाबाने सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देताना सरकार व महावितरण विभागाने वीज वितरण व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली वीज वितरण व्यवस्था सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडल्या जाईल असा इशारा देण्यात आला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *