शैक्षणिक वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील व सध्या मुरबाड तालुक्यातील कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षक चंद्रभान हारदे यांची शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख पदी निवड केली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिक्षक व विद्यार्थी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विभागीय स्पर्धा परिक्षेमधुन त्यांची ही निवड झाली असून 15+ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, विद्यार्थ्यांचे घवघवीत निकाल आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम यामुळे त्यांची केंद्र प्रमुखपदी निवड झाली.

केंद्र प्रमुख म्हणून आता त्यांच्यावर १५ ते २० शाळांचा शैक्षणिक आढावा, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी गुणवत्ता वाढ आणि शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी याची जबाबदारी राहणार आहे. हारदे सर मेहनती आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील शाळा नक्कीच प्रगती करतील असे मत गटशिक्षणाधिकारी मधुकर घोरड योनी व्यक्त केले. चंद्रभान हारदे म्हणाले, “ही जबाबदारी मोठी आहे. सर्व शिक्षक बांधवांना सोबत घेऊन तालुक्यातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू…

या निवडीबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ . राधाकृष्ण विखे पाटील,महाराष्ट्र राज्य भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ . सुजय दादा विखे पाटील,राहुरी मतदार संघाचे आमदार अक्षय शिवाजी कर्डिले,आमदार प्राजक्त तनपुरे,राहुरी पंचायत समितीचे माजी सभापती भीमराज हारदे यांनी या निवडीबद्दल चंद्रभान हारदे यांची केंद्रप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *