झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे एकल महिला दिन डॉ .सुजय दादा राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंच झरेकाठी व ग्रामपंचायत येथे जनसेवा युवा मंचचे सदस्य व ग्रामपंचायत सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सोमनाथ डोळे यांनी एकल महिलांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि त्यांच्या विचारधारेवर एकल महिलांना सन्मान आणि स्वयंरोजगार एकल महिलांच्या समस्या महिलांसाठी शासकीय योजना लाभ याबाबत मनोगत व्यक्त करताना एकल महिलांसाठी आलेल्या नवीन शासन धोरणाचे माहिती दिली गेली व महिलांना याबाबत मार्गदर्शन केले. एकल महिलांसाठी सर्वतोपरी योजनांचा लाभ मिळण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी जनसेवा युवा मंच उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले

झरेकाठी गावामध्ये एकल महिला या 130 आहेत या सर्व महिलांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनसेवा युवा मंच प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली

कार्यक्रमासाठीडॉ .सुजय दादा राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा युवा मंचचे सदस्य, सरपंचअशोक वाणी ग्राम विकास अधिकारी दत्तात्रय येळे,शांताराम ,चव्हाण पत्रकार सोमनाथ डोळे, बचत गटातील महिला,आरोग्य सेविका,अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी शिक्षिका,एकल महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *