अकोले : झुंजार न्यूज                                           अगस्ती सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवर त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे यांची बिनविरोध निवड झाली. आता कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी त्यांची निवड होणार की नाही याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाने सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला होता. या विजयात कै. अशोकराव भांगरे यांचा सिहाचा वाटा होता. त्यांच्यामुळे आदिवासी भागातून शेतकरी समृद्धी मंडळाला मोठे मताधिक्य मिळाले व या मंडळाला सर्व जागा जिंकता आल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *