शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेचे जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल घोरपडे यांनी उपमुख्यमंत्री व शिव सेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन बांधणी बरोबरच विविध जन हिताच्या प्रश्नां वर सातत्याने काम केले आहे.
त्यांनी विशेषतःनिळवंडे पाटपाणी योजने च्या लढ्यामध्ये गेली १५ वर्षांपासून लढा दिला आहे तळेगाव निमोण सारख्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळावे, आणि या भागातील पाणी टंचाई दूर व्हावी तसेच ग्रामीण भागा तील विकासकामांना गती मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा नियोजन समिती च्या सदस्यपदी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे