संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रलंबित हप्त्यांची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी पंचायत समिती संगमनेरने व्हॉट्स ॲपसेवा सुरू केली आहे .
अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य .डॉ . राधाकृष्ण विखे पाटील,व संगमनेर मतदार संघाचे आमदार अमोल खताळ ,संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांच्या हस्ते नुकतेच व्हॉट्स ॲप सेवा सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे .
घरकुल योजनेतील मंजूर लाभार्थ्यांसाठी९३२५६१५६९६ हा व्हॉट्स ॲपक्रमांक दिला आहे घरकुलाच्या संबंधित टप्पा पूर्ण झाला असूनही हप्ता मिळालेला नसल्यास लाभार्थ्यांनी घरच्या सध्या स्थितीचा स्पष्ट छायाचित्र पाठवणे असे आव्हान गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी केले आहे .
त्यासोबत लाभार्थ्याची पूर्णनाव गावाचे नाव संबंधित घरकुल योजनेचे नाव आणि आवश्यक माहिती नमूद करावी .प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करून प्रलंबित हप्त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे .घरकुल योजनेची अंमलबजावणी अधिक गतिमान पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे .त्यामुळे तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक माहिती व घराचा सध्या स्थितीचा स्पष्ट छायाचित्र तात्काळ व्हॉटस ॲपक्रमांकावर पाठवून ह्या सेवेचालाभ घ्यावा .,घरकुल योजना अधिक प्रभावी राबवण्यासाठी सहकार्य करावे .असे आव्हान त्यांनी केली आहे .
प्राप्त झालेल्या माहितीच्या दोन दिवसाच्या आत प्रत्यक्ष पाहणी केली जाईल पाहणीनंतर लाभार्थ्यांची घरकुल बांधकाम संबंधित टप्प्यानुसार पूर्ण झाल्याची निदर्शनास आल्यास नियमानुसार त्यांच्या प्रलंबित हप्ता तातडीने मंजूर करून निधी वर्ग करण्याची कारवाई केली जाईल .
घरकुल लाभार्थ्यांसाठी व्हॉट्स ॲप सेवा सुरू : प्रवीण सिनारे
या निर्णयाचे ग्रामीण,भागातील झरेकाठी येथील घरकुल लाभार्थी आदिवासी समाजाचे नेते सुरेश बर्डे व ग्रामस्थ यांनी स्वागत केले आहे .