{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

राहाता । झुंझार न्यूज  

 

समता नागरी सहकारी पतसंस्थेतील बहुचर्चित ६० कोटींच्या बनावट खाते आणि संशयास्पद व्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कॅप्टन अशोक खरात याला राहाता न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन अशोक खरात याने रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा हिच्या संगनमताने राहाता येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे. ५७ व्यक्तींच्या नावावर तब्बल १०० बनावट खाती उघडून त्याद्वारे ६० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार केल्याचे अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत निष्पन्न झाले होते.


कॅप्टन खरात याला यापूर्वी नाशिक मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथून शिर्डी पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आणि कायदेशीररीत्या अटक केली. आज त्याला राहाता न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


एसआयटीने (SIT) या गुन्ह्यात खरातला वर्ग करून पुढील तपासासाठी शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या चौकशीतून आणखी कोणती मोठी नावे समोर येतात आणि या घोटाळ्याचे धागेदोरे कोठपर्यंत पोहोचले आहेत, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *