झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी साम्राज्य ग्रुप, रहिमपूर यांच्या वतीने बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता रहिमपूर (ता. संगमनेर) येथे भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी माजी संचालक (बँक ऑफ बडोदा) बापुसाहेब गुळवे पाटील, भाजपचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अकोले उपसभापती मारुती मेंगाळ, आरपीआयचे संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, संगमनेर तालुका भाजप अध्यक्ष गोकुळभाऊ दिघे , राहुल दिघे , शांताराम शिंदे,गणपत शिंदे,सरपंच सविता शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर गुळवे,यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणून चोपडा येथील सुप्रसिद्ध दीपक गलांगी बँड, गायक भैय्या मोरे सिंगर तसेच संदीप गायकवाड (आदिवासी भाऊ) यांच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. आदिवासी संस्कृती, कला आणि परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या सोहळ्यास परिसरातून मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.

या भव्य मिरवणूक सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अहिल्यानगर सचिन शिंदे पाटील, पप्पूशेठ गाढे पाटील व आदिवासी साम्राज्य ग्रुप, रहिमपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *