लोकनेते बाळासाहेब थोरात व मोहन जोशी यांच्या उपस्थितीत निवड चाचणी स्पर्धा

संगमनेर । झुंझार न्यूज

 

करियर मधून खेळाच्या अनेक संधी उपलब्ध असून टेनिक्वाईट खेळामधून विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळावी याकरता शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.30 वा.सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार डॉ.सुधीर तांबे ययांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सब ज्युनिअर मुले व मुली टेनिक्वाईट अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धा होणार असल्याची माहिती ॲड सुहास आहेर यांनी दिली आहे.

या राज्यस्तरीय टेनिक्वाईट स्पर्धेच्या बाबत अधिक माहिती देताना ॲड.सुहास आहेर  म्हणाले की, या खेळामध्ये गोलची रबर रिंग पलीकडच्या खेळाडूंकडे फेकून प्रतिस्पर्ध्यांना आव्हान दिले जाते. हा युरोपमध्ये खूप लोकप्रिय आहे. माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या खेळाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संगमनेर मधून अनेक नामवंत खेळाडू निर्माण झाले असून टेनिक्वाईट मधूनही खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे याकरता संगमनेर मध्ये या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभ हस्ते व राज्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहन दादा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही टेनिक्वाईट अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा होणार आहे.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, अनिल वर्पे, सौ.दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, नूर मोहम्मद शेख, प्रा. बाबासाहेब गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजना करता जिल्हा सचिव प्रा. बाबासाहेब गायकवाड राजेंद्र थोरात सुनील मंडलिक यांच्यासह विविध क्रीडा शिक्षक विशेष परिश्रम करत आहेत.

तरी या स्पर्धेसाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्हा टेनिक्वाईट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *