संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील हनुमान मंदिरात ४८ व्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला आहे.
यावेळी पहिल्या दिवशी भागवताचार्य ह.भ.प. कृष्णाजी महाराज शास्त्री दरेगावकर,यांचे कीर्तन संपन्न झाले. कीर्तनात त्यांनी सांगितले की, _देव भेटण्यासाठी तुकोबारायांनी ५ सोपी सूत्रे सांगितली आहेत – भावे गावे गीत, कुणाची निंदा करू नका, मस्तक ठेंगा संतांच्या चरणी, गोड बोला, थोडा परोपकार करा. यातले एक जरी केले तरी देव भेटतो._
ते म्हणाले, _”४८ वर्ष अखंड भजन चालूच आहे, मग देव का भेटला नाही? कारण काही गोष्टी वजा करायच्या आहेत. चित्त शुद्ध करा म्हणजे त्याग करा.”
तुकोबारायांच्या त्यागाबद्दल ते म्हणाले, _”तुकोबाराय गरीब नव्हते, वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ४ लाख रुपये दुसऱ्याला व्याजाने दिले होते. पावणे चारशे वर्षांपूर्वीचे ४ लाख म्हणजे आज किती कोटी?”
तसेच पठ्ठे बापूराव आणि दादा महाराज सातारकर यांचा दृष्टांत सांगत ते म्हणाले, _”जशी रोग्यांसाठी हॉस्पिटल असतात, तशी बिघडलेल्यांसाठी मंदिरे आणि सप्ताह असतात.”_
*दि. ३० ऑगस्ट रोजी* ह.भ.प. प्रतिक्षाताई जगताप / वाणी (करमाळा / झरेकाठी) यांचे कीर्तन संपन्न झाले. *दि. ३१ ऑगस्ट रोजी* ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज घोडके (टाकळी लोणार) *दि. १ सप्टेंबर रोजी* ह.भ.प. दत्तगिरीजी महाराज (उंबरेश्वर देवस्थान) *दि. २ सप्टेंबर रोजी* ह.भ.प. आश्विनीताई हारदे (तुळापूर) *दि. ३ सप्टेंबर रोजी* ह.भ.प. वासुदेव महाराज लोंढे (कानडगाव) *दि. ४ सप्टेंबर रोजी* ह.भ.प. पांडुरंग महाराज तवंदकर (अकिवाट, कोल्हापूर) यांचे कीर्तन होणार आहे.
*सांगता सोहळा शनिवार दि. ०५/०९/२०२६ रोजी सकाळी ०९.०० वा. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक, सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय महाराज भोर (घारगाव) यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर समस्त ग्रामस्थ झरेकाठी यांच्यातर्फे महाप्रसाद* होणार आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविकांनी धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी मृदुंगाचार्य ह.भ.प. शरद महाराज जाधव (आळंदी), गायनाचार्य ह.भ.प. दत्ता महाराज खाकाळ, ह.भ.प. ऋषिकेश महाराज सोनवणे, व्यासपीठ चालक ह.भ.प. खुशालचंद महाराज वाणी,ह भ प श्रीकांत महाराज दाभाडे,ह. भ. प. बाबासाहेब महाराज वाणी हे उपस्थित आहेत.