निझर्णेश्वर येथे फडणवीस-विखे पाटलांच्या प्रतिमांना दुग्धाभिषेक

 

 

अहिल्यानगर । झुंझार न्यूज

 

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेच्या निषेधार्थ मराठा समाजातील युवकांनी एकत्र येत श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमांना मराठा समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री विखे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा समाजाच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतरच मनोज जरांगे पाटील यांनी विखे पाटील यांच्यावर भूमिका मांडण्यास सुरुवात केल्याचा दावा उपस्थित युवकांनी केला. या पार्श्वभूमीवर राजकीय मतभेद असले तरी आरोप-प्रत्यारोप करताना संयम राखावा, अशी अपेक्षाही युवकांनी व्यक्त केली.

 

मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर युवकांनी एकत्र येत आपली भूमिका स्पष्ट केली. समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन त्यातून मार्ग काढण्याला प्राधान्य द्यावे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

यावेळी अहिल्यानगर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गाडे, गोकुळ साबळे, भाऊसाहेब गुळवे, आदित्य पवार, भरत कुटे, राजेंद्र गाडे, सुशील शिंदे, धनंजय वर्पे, दत्तू हरदे, नंदू पानसरे, स्वप्नील चव्हाण, पंकज गुळवे, बाळासाहेब जोंधळे आदी उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *