संगमनेर । झुंझार न्यूज

 

घुलेवाडी गावचे आराध्य दैवत कान्होबा उर्फ कानिफनाथ महाराज देवस्थान ट्रस्टच्या इनाम जमिनीसाठी गावातील नागरिकांनी एकोप्याने सातत्याने पाठपुरावा केला.योग्य कायदेशीर लढाई केली, त्यामुळे या लढ्याला मिळालेले यश हे केवळ आणि केवळ गावकऱ्यांचे असून यामध्ये ज्यांचे श्रेय नाही अशा मंडळींनी  श्रेयवादाचे राजकारण करू नये व धार्मिक कार्यात राजकारण आणणे व विनाकारण लुडबुड करणं गैर असल्याचे भाविकांचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


 घुलेवाडी गाव हे पूर्वीपासून नाथ संप्रदायाचे असून शेकडो वर्षांची परंपरा कानिफनाथ महाराजांच्या या देवस्थानला आहे. देवस्थानच्या देखभालीसाठी व दिवाबत्तीसाठी इनाम जमीन देण्यात आली होती .मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे या जमिनीकडे दुर्लक्ष झाले आणि सदर जमिनीवर एका कुटुंबाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. कायदेशीर मालकी हक्क होत नाही हे लक्षात आल्यानंतर काही वेगळा मार्ग निवडण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

मात्र ग्रामस्थांची या देवस्थान प्रती मोठी आस्था असून सिताराम अण्णा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र  ढमाले ,उपाध्यक्ष व छावा संघटनेचे धडाडीचे कार्यकर्ते संदीप गंगाधर राऊत, कायदेशीर सल्लागार एडवोकेट संतोष लक्ष्मण राऊत यांनी लढा दिला. यातून हे सामूहिक यश मिळाले.

त्यानंतर अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर जागेवर ताबा घेत अस्मितेचे प्रतीक म्हणून पूजाअर्चा केली. यामध्ये कोणीही राजकारण करू नये अशी भावनाही अध्यक्ष मच्छिंद्र ढमाले उपाध्यक्ष संदीप राऊत व इतर कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

ज्यांचा संबंध नाही त्यांनी प्रसिद्धीसाठी उद्योग केला .

महायुतीचे संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यांचा या जागेच्या प्रकरणात कोणताही संबंध नाही .मात्र गावातील काही लोकांनी याला राजकीय रंग देत त्यांना बोलावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. ज्यांचा या कामात संबंध नाही ,त्यांनी खरे तर यायलाच नको होते. हा गावकीचा एकोप्याचा विजय असून यामध्ये कोणीही राजकारण करू नये तसेच वेगळा रंग देण्याचाही प्रयत्न करू नये असेही राजू खरात यांनी म्हटले आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *