झरेकाठी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी पशुधन विमा योजनेचा लाभ घ्या असे आव्हान झरेकाठी येथील सामाजिक कार्यकर्ते भिकाजी वाणी यांनी पशुपालक यांना केले आहे.
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत राज्यामध्ये पशुधन विमा योजना राबविण्यास प्रशासकीय व वित्तीय मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. हवामानातील अपेक्षित बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाणी, गंभीर अपघात तसेच विविध साथीच्या रोगामुळे पशुधन दगावल्यास पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत विमा संरक्षणाच्या माध्यमातून पशुपालकांना त्वरित आर्थिक नुकसान भरपाई उपलब्ध करून देणे, त्यांचे आर्थिक स्थैर्य कायम राखण्यात तसेच त्यांना कर्जबाजारी होण्यापासून वाचवणे या उद्देशाने राज्यात पशुधन विमा योजना प्रभावीपणे राबविण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन. सामाजिक कार्यकर्ते भिकाजी वाणी यांनी. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाकडून माहिती घेऊन पशुपालक यांना आवाहन केले आहे.


ते पुढे म्हणाले की या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपूर यांचे मार्फत करण्यात येत असून मंडळामार्फत योजना राबविण्यासाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, लिमिटेड या विमा कंपनीची निवड केली असून पशुपालकाकडील देशी व संकरित दुभती गाई, म्हशी, बैल ,रेडा शेळ्या, मेंढ्या यासारख्या पशुधनाचा विमा करण्यासाठी पशुधन विमा योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रती कुटुंब कमाल पशुधन संख्या १० असून दहा पेक्षा जास्त असलेल्या पशुधनासाठी विमा हप्त्याची पूर्ण रक्कम पशुपालकाने भरणे आवश्यक राहील.


योजनेअंतर्गत दुभत्या गाईसाठी अधिकतम विमा संरक्षण रक्कम रुपये ७० हजार, दुभत्या म्हशीसाठी रुपये ८० हजार, बैलासाठी ७० हजार, रेडा ८० हजार व शेळी ,मेंढी ७००० प्रत्येकी प्रमाणे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल. पशुपालकांना आपल्याकडील आपल्या मालकीच्या पशुधनाचा विमा करताना विमा हप्त्याच्या १५ टक्के रक्कम भरावी लागेल, व उर्वरित ८५ टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनामार्फत दिली जाईल. अशा पशुधनाचा विमा उतरवण्यासाठी त्याची किंमत चालू बाजारभावानुसार निश्चित केली जाईल. आपल्या मालकीच्या पात्र पशुधनाचा विमा करण्यासाठी पशुधन मालकाने, या ॲप वर स्वतःची व विमा करवायच्या पशुधनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

अहिल्यानगर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांच्याकडे. सामाजिक कार्यकर्ते भिकाजी वाणी यांनी एका पत्रकाद्वारे अशी विनंती केली आहे की या योजनेची अंमलबजावणी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात पशुसंवर्धन डॉ.अधिकारी यांच्या मार्फत या योजनेची प्रसिद्धी, तसेच जनजागृती करण्यात यावी . जेणेकरून ह्या योजनेची जास्तीत जास्त पशुपालक लाभ मिळेल .

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *