संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील रहिवासी, मुंबईतील भारत सरकारच्या पोस्टल विभागातील युनियनचे झुंजार नेते आणि पॅंथर-आरपीआय चळवळीतील ज्येष्ठ नेते आर. जे. गायकवाड यांच्या २१व्या स्मृतीदिनानिमित्त मुंबई दादर येथील चैत्यभूमीवर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

आर. जे. गायकवाड सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कालिदास कळमकर यांचे स्वीय सहाय्यक योगेंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

चैत्यभूमी येथे भंतेजींच्या हस्ते बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर भंतेजींना चिवरदान करण्यात आले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. दादर परिसरातील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटपही करण्यात आले.

यावेळी योगेंद्र गायकवाड यांनी आर. जे. गायकवाड यांच्या सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत चिवरदान आणि विद्यार्थ्यांना फळवाटप करण्याचा संकल्प यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *