संगमनेर । झुंझार न्यूज
आर्किटेक्ट बि.आर.चकोर यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती सौ.मीराताई भीमाशंकर चकोर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने संगमनेर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.
सौ.मीराताई चकोर यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या सभापती म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले. जिल्हाभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन मोठे केले. याचबरोबर तालुका पंचायत समितीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम केले.
मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या यानंतर काल गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 8.30 वा त्यांची प्राणजोत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 58 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती आर्किटेक्ट बि.आर.चकोर, मुलगी असा परिवार आहे. स्वर्गीय हरिभाऊ सांगळे यांच्या त्या कन्या त्यांच्याकडूनच राजकीय व सामाजिक वारसा त्यांना मिळाला होता. त्यांच्यावर पिंपळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आ.सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सौ.दुर्गाताई तांबे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सांगळे, गणपतराव सांगळे, ॲड ज्ञानेश्वर सांगळे, सौ.अर्चनाताई बालोडे यांच्यासह निमोण व नान्नज दुमाला परिसरात विविध गावांमधून नागरिक व पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.



