{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

ना विखे पाटील व आ. खताळ यांच्या प्रयत्नातून विजेचे रोहित्र मिळाल्याने शेतकरी समाधानी

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

भारनियमनाच्या संकटात महायुती सरकारने तालुक्याला २००रोहीत्रांची उपलब्धता करून दिली आहे. पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटीलआणि आ.अमोल खताळ यांच्या माध्यमातून नादुरूस्त रोहीत्र बदलून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न झाले आहेत.विशेष म्हणजे ट्रान्स फॉर्मर जळाल्यानंतर कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांवर कोणताही अर्थिकभार येवू न देता कार्यवाही झाल्याचे समाधान ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून विजेच्या भारनियमानाच्या त्रासाला शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी रोहीत्र नादुरूस्त होण्याचे प्रकार घडल्याने शेतीसह ग्रामीण भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला.अनेक गावांनी रोहीत्र नव्याने बसून देण्याची किंवा रोहीत्रावरील भार वाढवून देण्याची मागणी वाढली होती.शेतकऱ्यांची वीज समस्या लक्षात घेवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यासाठी १२५रोहीत्र उपलब्ध करून दिले. आमदार .अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे ८० नविन रोहीत्र नव्याने बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांची वीजेची समस्या दूर करण्यात यश आले.१आॅगस्ट ते १७ सप्टेंबर २०२६ या ४८ दिसवात मागणी प्रमाणे रोहीत्र उपलब्ध करून देण्याचे मोठे काम महायुती सरकार च्या माध्यामातून झाले आहे.आणखी 40 रोहीत्र काही दिवसात उपलब्ध होणार असल्याचे आमदार .खताळ यांनी सांगितले.

संगमनेर तालुक्यातील डोळासणे, मेंढवण,मेंगाळवाडी या गावातील वाड्या वस्त्याना अनेक वर्ष वीज पुरवठा झालेला नव्हता या गावांसाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने आणि आ.अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याने पहील्यांदा वीज पुरवठा होवू शकला आहे.

यंदाच्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने वीजेची उपलब्धता तसेच वितरण व्यवस्थेचे असलेले आव्हान मोठे आहे.यातूनही मार्ग काढण्या साठी आ.अमोल खताळ यांनी वीज वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्या साठी विशेष प्रयत्न केले आहेत.

विजेचे भारनियमन कमी व्हावे याकरीता अभियंत्यांशी सातत्याने संपर्कात असून,मागील दोन दिवसां पासून भारनियमन कमी होत आहे. गावठाण फिडरवर ए जी फिडर जोडले जात असल्याने सांयकाळी सहा ते नऊ या कालावधीत भार नियमन वाढत होते. गावठाण फिडरवर येणारा एजीचा भार कमी व्हावा म्हणून हे फिडर स्वतंत्र करण्याची प्रक्रीया सुरू झाली असून, गावठाण फिडर सिंगल फेज करण्याबाबत तात्तडीने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

 

श्री अमोल खताळ पाटील
आमदार संगमनेर विधानसभा

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *