{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

जादा दूध पुरवठा करणाऱ्या १० दूध उत्पादकांचा भव्य सत्कार; दत्तगिरी महाराज यांनी संस्थेच्या कार्याचे केले कौतुक

आश्वी । झुंझार न्यूज

दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महालक्ष्मी सह दूध उत्पादक व प्रक्रिया संस्था, पिंप्रीफाटा (आश्वी खुर्द) यांच्या वतीने दीपावली सणाचे औचित्य साधून दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये २५ पैसे रिबेट तसेच किराणा साहित्य व फराळाचे वाटप करण्यात आले. उंबरेश्वर व रामेश्वर देवस्थानचे ट्रस्टचे मठाधिपती गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व सामाजिक कार्यकर्ते भारतराव पा. गिते यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीची तसेच प्रगतीची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे संस्थेने प्रगतीचा टप्पा गाठला असून दूध उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गुरुवर्य दत्तगिरी महाराज यांनी संस्थेच्या कामकाजाचे विशेष कौतुक केले. दूध उत्पादकांचे हित जपणारी आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी संस्था म्हणून महालक्ष्मी दूध संस्थेचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सहकाराच्या माध्यमातून दूध उत्पादकांची आर्थिक उन्नती साधणे ही महत्त्वाची बाब असून संस्थेने भविष्यातही अशीच प्रगती करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

जादा दूध पुरवठा करणाऱ्या १० उत्पादकांचा सन्मान

संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या दूध उत्पादकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दहा दूध उत्पादकांचा यावेळी भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या योगदानाची दखल घेत संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमामुळे दूध उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दीपावलीच्या सणानिमित्त दूध उत्पादकांना ५ रुपये २५ पैसे रिबेट, किराणा साहित्य आणि फराळाचे वाटप करून संस्थेने सभासदांप्रती आपली बांधिलकी जपली आहे. सणासुदीच्या काळात दूध उत्पादकांच्या कुटुंबीयांनाही आनंदाचा क्षण मिळावा, या भावनेतून संस्थेने हा उपक्रम राबविला.

कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे चेअरमन रमेशशेठ गिते यांनी उपस्थित मान्यवर, संचालक मंडळ, दूध उत्पादक सभासद आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ संचालक कैलासराव गायकवाड, म्हस्के भाऊ गायकवाड, सर पांडुरंग गिते, चंद्रभान गिते, बाजीराव गिते, कारभारी मांढरे, विनायक गिते, डॉ. रवींद्र दराडी, डॉ. रंगनाथ गिते, काशिनाथ गिते, सोमनाथ दातीर, लहानू घुगे, उत्तम गिते, सुरेशराव मुंढे, संदीप गिते आदींसह संस्थेचे पदाधिकारी, संचालक आणि बहुसंख्य दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.

दूध उत्पादकांच्या कष्टाचा सन्मान, आर्थिक हिताची जपणूक आणि सहकाराच्या माध्यमातून विकासाची वाटचाल, या त्रिसूत्रीवर महालक्ष्मी दूध उत्पादक व प्रक्रिया संस्थेची सुरू असलेली वाटचाल परिसरातील दूध उत्पादकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *