संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील कु अक्षदा सुनिल बुरकुल हिने बँकींग क्षेत्रात पहिल्याचं प्रयत्नात यश संपादन केल्याने तिची बँक कृषी क्षेत्र अधिकारी पदी निवड झाली .

कु . अक्षदा बुरकुल हिने २०२२ या वर्षी आपले कृषी पदवी शिक्षण के के वाघ कृषी महाविदयालय नाशिक येथून पूर्ण केले . त्यानंतर बँकींग क्षेत्रात करिअर बनविण्याकरिता तिने त्याचं वर्षी इन्स्टिट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन ( आयबीपीएस ) या संस्थेतंर्गत घेण्यात आलेल्या आयबीपीएस एस ओ या बँकींगच्या परिक्षेची तयारी जिद्दी व चिकाटीने करत फक्त नऊ महिन्यातचं पहिल्या प्रयत्नात ती उर्तीर्ण झाली .तिची सेंन्ट्ल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत बँक कृषी क्षेत्र अधिकारी पदी म्हणून निवड झाली .

या निवडीबद्दल कु अक्षदा बुरकुल हिचे हंगेवाडी व परिसरातून अभिनंदन होत असून सामाजिक कार्यकर्ते सुनिल शरद बुरकुल यांची ती कन्या तर संगमनेर येथील सह्याद्री विदयालयांच्या शिक्षिका सुरेखा बुरकुल – सानप यांच्या ती भाची आहे
Post Views: 161
