संगमनेर : झुंजार न्यूज
 संगमनेर तालुक्यातील अंभोरे येथील अंगणवाडी करिता राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख व माजी संरपच भास्कर खेमनर यांच्या विशेष प्रयत्नातून व  ग्रामपंचायतीच्या 15 वित्त अयोगातून  मोफत साहित्य वितरण करण्यात आले.
 अंगणवाडीतील लहान – लहान मुलांचा भविष्याचा पाया समजला जाणाऱ्या अंगणवाडीकरिता फर्नीचर , कपाट ,टेबल ,खुर्ची ,शालेय मुलांना आहार तयार करणेसाठी आवश्यक असणारी भांडे संच, बैठकीसाठी सतरंजी,शालेय साहित्यांचे अंभोरे गावचे जेष्ठ मार्गदर्शक ह.भ.प.नारायणगिरी महाराज सहकारी दुध उत्पा.संस्थेचे चेअरमन बाळासाहेब देशमुख अंभोरकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले .
यावेळी सरपंच सौ.सुरेखाताई भाऊसाहेब खेमनर,उपसरपंच श्री.किसनराव खेमनर ,सदस्य श्री.भाउसाहेब रखमा खेमनर,श्री.संपत गोविंद खेमनर प्रा.नारायण सहादु खेमनर,श्री.सदाशिव खेमनर, खेमनर,सौ.सुमन महादू सोर,सौ.रुपाली गोरख कदम,सौ.प्रियांका आण्णासाहेब जगनर,सौ.नंदिनी माणिक पवार,सौ.शितल संदीप कोटकर,सौ.शांता नितीन खेमनर , सोसायटी चेअरमन रावजी भागा खेमनर तसेच ग्रा प , सोसायटी सदस्य व ग्रामस्थ , कर्मचारी  मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed