संगमनेर : झुंजार न्यूज
बाजार समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपला स्वतंत्र पँनल उभा केला. याच धर्तीवर आता नगर पालिकेच्या निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केली असून अनेक दिग्गज आजी माजी नगरसेवक विखेंच्या नेतृत्वाखाली भाजपात जाण्यास तयार झाले आहे. वरिष्ठ नेत्यांशी तश्या भेटी घडून आणल्या असून आ थोरातांना मोठा राजकीय धक्का देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

संगमनेर नगर पालिकेत आ . थोरांताची एक हाती सत्ता असुन गेली अनेक वर्षांपासून त्यांचे नेतृत्वाखाली पालिकेचा कारभार सुरू आहे. भा ज पा , राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट यांचे नगरसेवकहि निवडणून आले आहे. मात्र निवडून येताच थोरात गटात सामील होण्याची परंपरा कायम आहे. यामुळे विरोधक फारसे आक्रमक नाही. शिवसेना भाजप युतीच्या काळात विरोध चांगला टिकून होता. कै. कुंदनसिंह परदेशी . कै. राधावल्लभ कासट तर अँड. श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे , निलेश जाजू , दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक , जयवंत पवार, गजेंद्र अभंग, कैलास वाकचौरे, कीशोर पवार, इसहाकखान पठाण , लाला बेपारी, यासह इतर काही नगर सेवकांनी पालिकेत चांगले काम करून चुकीच्या कामात सत्ताधाऱ्यांना कडवा विरोध केला. पालिकेत सत्ताधारी व विरोधकांची चांगली टीम होती. पालिकेच्या सभागृहात विविध विषयांवर चर्चा घडवून आणली जात होती. आता मात्र चित्र बदलले असून पालिकेत सावळा गोंधळ सुरू आहे. नगर सेवकांची मुदत संपून दिड वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. मुख्याधिकारी राहूल वाघ काम पाहत आहे. त्यांना नगर पालिकेत सुवर्ण काळ पाहायला मिळत आहे. सर्वच कामे टेंडर त्याच्या हातात असुन सध्या त्यांना रान मोकळे आहे. नागरिकही आता बघ्याची भूमिका घेत असून सतत नगर सेंवकांना जाब विचारणारे नागरिक पालिकेत जाण्याचे धाडस करत नाही. मुख्याधिकारी नगर सेवक पदाधिकार्यांना जुमानत नाही. याचा फायदा कर्मचारीही घेत आहे. पालिकेत फक्त अधिकारी ठेकेदारांचे राज्य आहे. आठ दहा वर्षापासून काही ठेकेदार चिटकून बसले आहे. यात अनेक नगरसेवकांची घुसमट होते नेत्यांच्या कानावर ही बाब वारंवार लक्षात आणून दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिस्थिती बदलत नसल्याने आ. थोरातांचे विश्वासु जवळचे सहकारी नगरसेवक देखिल आता वेगळा विचार करू लागले आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गळाला अनेक दिग्गज नगरसेवक लागले आहे. यात काही महिला नगर सेवकांचाही सहभाग असून या करिता भा ज पाच्या वरीष्ठ नेत्याशी भेट घालून चर्चा घडवून आणली आहे. विखे आता फक्त संधीची वाट पाहून आहे. योग्य वेळ आणि संधी येताच आ थोरातांना मोठा धक्का देणार आहे. तशी तयारी पूर्ण झाली असल्याने नगरसेवक देखिल सावधगिरीने पावले टाकत आहे. या कामी भाज पा ची एक वेगळी टीम काम पाहत आहे. काँग्रेसकडून सन्मानाची वागणूक , प्रतिष्ठा , सहकार्य मिळत नाही , कामे होत नाही , नेते भेटत नाही . यावर अनेकांनी विखेंशी जवळीक साधली आहे. याबाबत आ.थोरातांपासून काही माहिती लपवली जात आहे. भरवशाचे विश्वासु पदाधिकारी काही महिन्यांपासून थोरातांना भेटत नाही. बाजार समितीसाठी निवडणूक होत असून त्याचा निकाल येताच नगर पालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी हालचाली गतिमान होणार आहे.

चौकट-
माहीती देतो पण नाव नको
नगर पालिकेत होणार्या गैरकारभाराची आणि विखे गटात सामील होण्यासाठी झालेल्या गुप्त बैठका बाबत माहिती समोर आली. अनेक आजी माजी नगरसेवकांनी पक्षाला राम राम ढोकला आहे. आता वेळ आली नाही वेळ येताच मोठा स्फोट होणार आहे. माहीती देतो पण नाव नको अशी विनंती केली.
