राज्यातील सहा विभागाच्या संघांचा सहभाग

अहमदनगर : झुंजार न्यूज 

क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबी एम) या संस्थेच्या वतीने अंधांच्या १०व्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आत्मा मालिक क्रिकेट अकॅडमी, कोकण ठाण, शिर्डी, जिल्हा अहमदनगर येथे ३० एप्रिल व ०१ मे या दोन दिवसांत केले जाणार आहे. या सामन्यात महाराष्ट्रातील सहा विभागाचे संघ सहभाग घेतील.स्पर्धेचे उद्घाटन मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ३० एप्रिलला पार पडणार आहे.

या स्पर्धेमध्ये मुंबई विभाग, कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र खानदेश, मराठवाडा व विदर्भ असे एकूण सहा संघ सहभागी होतील. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक रोक रक्कम दिली जाईल, इतर उर्वरित चार संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून काही विशिष्ट रोख रक्कम दिली जाईल.

हे सर्व सामने आंतरराष्ट्रीय नियमांना अनुसरून आयोजित केले जाणार असून यात पंचांचा निर्णय अंतिम असेल. स्पर्धेत तीन- तीन संघांचे दोन गट तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष पंकज चौधरी यांनी दिली.

 

Suchita S. Kadam
Chief PRO ( Cricket Association For The Blind Of Maharashtra)
8082630989/8850119304

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed