संगमनेर : झुंजार न्यूज
शिबलापूर ग्रामपंचायतीच्या दोन जागासाठी नुकतीचं पोटनिवडणूक मोठ्या उत्सहात पार पडली. यामध्ये आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने दोन्ही जागा निवडून आणल्या होत्या. मात्र शेतकरी विकास मंडळाचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. सोमवारी जिल्हाधिकारी यानी सरपंच प्रमोद बोद्रें यांची निवडचं बेकायदेशीर ठरवल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शिबलापूर ग्रामपंचायतीवर ना. विखे पाटील यांच्या गटाची बहुमताची सत्ता होती. सुरवातीला ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे सरपंच सचिन गायकवाड यानी काही महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे नवीन सरपंच निवडीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला होता.
ग्रामपंचायत कार्यलयात निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असता ना. विखे पाटील गटाकडून सचिन विनायक गायकवाड व शुंभागी दिपक रक्टे यानी तर आ. थोरात गटाकडून प्रमोद बोद्रें यानी सरपंच पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीत तीनही अर्ज राहिल्यानतंर विखे गटाच्या सचिन गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. ना. विखे पाटील गटाचे ७ सदंस्य तर आ. थोरात गटाच्या ३ सदंस्यानी गुप्त पद्धतीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भाग घेतला.
याआधी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्यामुळे दोन्ही उमेदवाराना सम-समान म्हणजे ५ मते पडली. त्यामुळे सरपंच पदाचा तिढा निर्माण झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा पवार यानी वरीष्ठाशी चर्चा करुन ईश्वर चिठ्ठी टाकून निर्णय घेण्याचे जाहीर केले. यावेळी ४ वर्षाच्या मुलाच्या हस्तें सरपंच पदाची चिठ्ठी काढली असता त्यामध्ये प्रमोद बोद्रें यांचे नाव निघाल्यामुळे त्यावेळी त्याना सरपंच घोषित करण्यात आले होते.
त्यामुळे शिबलापूर ग्रामपंचायतीत ना. विखे पाटील गटाचे बहुमतासाठी आवश्यक ७ ग्रामपंचायत सदंस्य ना. विखे गटाकडे असतानाही विरोधी गटाचे प्रमोद बोद्रें हे गुप्त मतदान प्रक्रियेत सरपंच पदी निवडून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
यानतंर जनसेवा मंडळाच्या ग्रामपंचायत सदंस्या शुंभागी दीपक रक्टे यानी सरपंच निवडीवर आक्षेप घेत ही निवड रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याआधी जनसेवा मंडळाच्या एका महिला ग्रामपंचायत संदस्याचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे सदंस्यत्व रद्द झाले असतानाही त्या सदंस्याने सरपंच निवड प्रक्रियेत भाग घेऊन मतदान केल्यामुळे ही निवड प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता.
याचं दरम्यानच्या काळात राजकीय सत्ता नाट्याच्या पुलाखालून बरेचं पाणी वाहून गेल्यामुळे प्रभाग २ व प्रभाग ४ अशा दोन रिक्त जागासाठी नुकतीचं प्रशासनाकडून पोटनिवडणूकीची प्रक्रिया पार पडली होती. या दोन्ही जागावर आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने मोठ्या फरकाने विजय मिळवत ना. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला धक्का दिला होता.
शिबलापूर ग्रा प मधून सौ सविता विठ्ठल मुन्तोडे ह्या सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या मात्र विरोधी गटानी अपिल केल्यानंतर जातपडताळणीच्या तपासणीत कागदपत्राची पूर्तता न झाल्यानेचं त्यांचे पद रदद झाले होते याबाबतही तहसिलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल दिला होता . मात्र नुकत्याचं झालेल्या संरपदाच्या निवडणुकीत निवडणुक आधिकारी व तहसिलदारांचा समन्वय न झाल्याने संबंधीत सौ मुन्तोडे यांनी संरपचपदाच्या निवडणुकीत सहभाग नोंदवून मतदान केले यामुळे ही झालेली निवडणुकचं बेकायदेशिर ठरली असल्याचा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने ही संरपचपदाची निवडणुक आता पुन्हा घ्यावी लागेल
