शिर्डी : झुंजार न्यूज 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना . रामदास आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे शनिवार दि २७ मे , २८ मे २०२३ या दोन दिवशीय भव्य अधिवेशन राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , पालकमंत्र्यासह खासदार , आमदार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली .

यावेळी आयोजकांनी दिलेल्या माहीतीनुसार २७ मे रोजी सकाळी ११ वाजता रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठकी शिर्डी येथील इन पॅलेस हॉटेल मध्ये होणार असून या बैठकीत पक्षाचे नोकसेन -५२ ( नॉगालँड ) येथील ए लिमा वन चांग , तुगसाँग सरदार -५४ येथील लिमटिचाबा चांग या निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार होणार आहे तर दुपारी राखीव वेळ असून कार्यकर्त्याच्या भेटी गाठी घेवून समस्या जाणून घेतल्या जातील रविवारी दि २८ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ना . रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद होणार तर संध्याकाळी ५ वाजता राहाता – शिर्डी रस्ता ‘ गोदावरी वसाहत ‘ कांदा मार्केट तथा विखे पाटील सोसायटी पेटोल पंपा समोरी प्रांगणात जाहिर सभा होणार असून या अधिवेशनाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे महसूल मंत्री तथा पालक मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह रिपाई महीला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा सौ सिमाताई आठवले , भाजपाचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड , खासदार सदाशिव लोखंडे , खासदार डॉ सुजय विखे पाटील , जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले , भाजपा आ बबनराव पाचपुते , आ . राम शिंदे , आ श्रीमती मोनिकाताई राजळे , सौ स्नेहलताताई कोल्हे , श्रीमती चद्रकांता सोनकांळे , माजी सामाजिक राज्यमंत्री अविनाश महातेकर , रिपाई प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे , प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम , गौतम सोनवणे , युवा राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू कागदे , सूर्यकांत वाघमारे , , भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे , उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर , शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांच्यासह देशातील , राज्यातील पदाधिकारी , जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित रहाणार आहे .

तरी या दोन दिवशीय अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली असून या अधिवेशना करिता लाखोंच्या संख्येने उपस्थिती रहाणार असल्याने आयोजकांकडून चोख असे नियोजन करण्यात आल्याची संपूर्ण माहिती जिल्हा संपर्क प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव , प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , उत्तर महाराष्ट् अध्यक्ष राजाभाऊ कापसे , बाळासाहेब गायकवाड , राज्य सचिव दिपकराव गायकवाड , उत्तर जिल्हा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे , जिल्हा विभाग प्रमुख भिमा बागुल युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे या आयोजकांनी दिली

यावेळी चंद्रकांत सरोदे , धनजंय निकाळे , कैलास शेजवळ , रमेश शिरकांडे , रावसाहेब बनसोडे , किरण कोळगे , आशिष शेळके , सुनिल शिरसाठ , राजेंद्र गवांदे , अनिल नन्नवरे , विलास साळवे , संजय भालुमे , राजू उंबाळे , राजाभाऊ जगताप , सुशिल धायंजे , बाबा राजगुरु , सतिष मगर , अविनाश भोसले , किरण दाभाडे , अमित काळे , विजय पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या मान्यतेने रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशनात मंजूर करण्यात येणारे ठराव पुढील प्रमाणे –

1) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने अनुसूचित जाती जमाती च्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा

2) – दलित आदिवासी गरीब भूमिहीनांना 5 एकर जमीन देण्याचा कार्यक्रम शासनाने राज्यात राबवावा.

3) – दलित मागासवर्गीयांना महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाकडून प्रत्येकाला बिनव्याजी 10 लाख रुपयांचे कर्ज द्यावे ज्यामुळे त्यांना आपला उद्योग धंदा स्वयंरोजगार उभारता येईल.

4) मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र अद्याप सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अद्याप आरक्षण मिळाले नाही आमचा मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.

5) -ओबीसी आणि सर्व जाती समूहांची जातीनिहाय जनगणना व्हावी

6) – भटक्या विमुक्तांसाठी ओबीसी मध्ये वर्गवारी करून भटक्या विमुक्तांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे.

7) गायरान जमिनीचा शासन निर्णय 14 एप्रिल 1990 चा आहे. त्यातील 1990 च्या मुदत मर्यादेत वाढ करून 14 एप्रिल 2010 पर्यंत चे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करावे .

8) – 2019 पर्यंत च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता द्यावी . तसेच राज्यातील सर्व महापालिकांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना एस आर ए लागू करावी

9) खाजगी उद्योगधंद्यांमध्ये एस सी एस टी आणि ओबीसी ला आरक्षण देण्यात यावे. सरकारी नोकरी लवकर उपलब्ध होत असल्याने खासगी मोठ्या उद्योगांत नोकरीतील एस सी एसटी ओबीसीना आरक्षण देण्यात यावे.

10) – सफाई कामगार अनेक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. मात्र त्याचा त्यांना काही लाभ होत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जे नित्याचे आहे ते काम कंत्राटी तत्वावर करू नये त्यात कायमस्वरूपी कामगार असावेत. त्यामुळे सफाईकाम नित्याचेच असल्याने सफाईकामातील कंत्राटी पद्धत बंद करून कायमस्वरूपी सफाईकामगार नेमावेत. सफाई कामगारांना अनेक वर्षे कंत्राटी ठेवण्यात येते त्यात बदल करून त्यांना कायम करावे. ज्या कंत्राटी सफाईकामगारांना सध्या 5 वर्षे झाली आहेत त्यांना तातडीने कायमस्वरूपी तत्वावर सफाई कामगार पदाची नोकरी देण्यात यावी.

11) शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान एकर खर्चच्या दुप्पट दराने देण्यात यावे.

12) सर्व मागासवर्गीय महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे.

13) मागासवर्गीय विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तत्काळ मंजूर करुन वाटप करुन द्यावी.

14) SC-ST यांच्यासाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करणे.

15) गावपातळीवर SC समाज्याच्या स्मशानभुमी व जागा जमिनी यांच्यावरील अतिक्रमण काढणे.

16) स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये SC ज्या जागा घटविल्या आहेत, त्या लोकसंखेनुसार कायम कराव्यात.

17) विशवरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्येक ठिकाणची पदस्पर्श भुमी शासनाने ताब्यात घेऊन त्यावर स्मारकं उभारावीत.

18) तालुका पातळीवर प्रत्येक ठिकाणी SC-ST मुलांसाठी नालंदा प्रमाणे स्टडी सर्कल असावे.

19) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मरकं कोठे होत असतील तर केंद्र व राज्य सरकारने त्यांना नियम अटिंच्या अधिन राहून निधी द्यावा.

20) SC – ST या वर्गातील तरुणांना लघुउद्योग आणि कुटीर उद्योग यासाठी भरिव अनुदान देऊन त्याची अंमलबजावणी करावी.

21) दुर्गम अदिवासी भागात SC व ST लोकांसाठी स्वतंत्र बजेट किंवा तरतुद करावी. (उदा. अकोले)

22) मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी अधिक योजना उपलब्ध करुन त्यावर अनुदान द्यावे.

23 ) सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन मंजूर करण्याबाबत

24 ) साई संस्थान कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुप क रण्यात यावे

25 ) आरोग्य दूत समजल्या जाणाऱ्या आशा स्वयं सेविका यांना मानधन नको तर वेतन दया .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *