मुंबई : झुंजार न्यूज 

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या भारतात वाहनांची सुरुवात झालेली आहे हा तो काळ होता जेव्हा भारतीय गाड्या त्यांचं मार्केट खूप वेगाने वाढत होत्या . यादरम्यान देशात इतिहास रचणारी बरेच वाहने बाजारात दाखल करण्यात आली होती. त्यातील काही वाहनांची 22 वर्षांनंतरही जोरात मागणी बाजारपेठेत आहे. महिंद्रा बोलेरो भारतीय कार निर्मात्याकडून येणारी ही एक देखील अशीच एक suv आहे, जी आज रोजी ही बाजारात आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहे. त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी रफ एंड टफ suv आहे.आपल्या देशातील ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्येही या suv ला खूप पसंती दिली जात आहे .

या suv कारच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येईल की, जानेवारी 2023 मध्ये SUV कार जवळ जवळ 9000 लोकांनी बुक केली होती. हे अजूनही महिंद्राच्या विक्री होणाऱ्या सगळ्यात जास्त मॉडेल्सपैकी एक आहे. त्याची बॉक्सी डिझाईन व तसेच उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि देण्यात आलेलं शक्तिशाली इंजिन खराब रस्त्यांवरही चांगली कामगिरी करणारी suv बनवत असते .शिवाय 7 ते 8 लोक बसू शकतील एवढी बोलेरोमध्ये जागा आहे .

पॉवरफुल इंजिन-

अतिशय शक्तिशाली बोलेरो फेसलिफ्टमध्ये 1.5 -लिटर mHawk 75 डिझेल इंजिन कंपनी कडून देण्यात आलेलं आहे. हे इंजिन 3600 rpm वर 75 BHP पॉवर आणि 1600 ते 2200 RPM वर 210 Nm टॉर्क निर्माण करत असते .5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह हे इंजिन जोडन्यात आलेलं आहे.

किंमत 

सध्याच्या महिंद्रा बोलेरोची मॉडेलनुसार कमीत कमी किंमत ही 11.39 लाख ते जास्तीत जास्त किंमत 12.71 लाख दरम्यान आहे. BS6- बोलेरो फेसलिफ्ट महिंद्राने नुकतीच भारतात लाँच केलेली आहे ज्याची कमीत कमी किंमत ही 9.47 लाख (एक्स-शोरूम मुंबई) पासून ठेवण्यात आलेली आहे. हे मॉडेल 3 प्रकारांमध्ये म्हणजेच B4, B6 व B6 (O) सह बाजारात उपलब्ध असेल.

वैशिष्ट्ये-

नवीन बाजारात दाखल झालेल्या बोलेरोच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कंपनी कडून देण्यात आलेलं आहे , मॅन्युअल एसी आहे, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ संगीत प्रणाली देण्यात आलेली आहे , पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. सुरक्षेच्या बाबतीत , ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज दिलेल्या आहेत , अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर बसविन्यात आलेली आहेत.

बोलेरो भारतीय बाजारपेठेतील निसान मॅग्नाइट, Tata Nexon, Maruti ब्रेझा, किया सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या सबकॉम्पॅक्ट suvशी स्पर्धा करत असताना बाजारात दिसत असते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *