mumbai / Zunjar News
महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबईत देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे रिपब्लिकन पक्षातर्फे अभिनंदन केले.
अजितदादा पवार भाजप शिवसेना रिपाइं महायुती सोबत आल्यामुळे आमच्या महायुती ची ताकद अधिक वाढली आहे. राज्य सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाटा मिळावा यासाठी आपण आज अजितदादा पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती ना.रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
अजितदादा पवारआल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचे पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ना.रामदास आठवले म्हणाले.यावेळी रिपाइं चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी मुंबई अध्यक्ष सचिनभाई मोहिते; महिला नेत्या ऍड.आशाताई लांडगे; सोना कांबळे;जिल्हा अध्यक्ष संजय पवार, सुनिल मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
