संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर बस स्थानक येथे संभाजी भिडे विरोधात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन झाले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे,राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, आर.बी. रहाणे ,रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, नितीन अभंग, दिलीप जोशी, गजेंद्र अभंग, सुरेश थोरात,जावेद शेख, सौ पद्माताई थोरात,सौ अर्चनाताई बालोडे, सौ सुनंदाताई जोर्वेकर ,संतोष हासे, संपतराव डोंगरे,गणेश मादास, दत्तू कोकने, सुरेश झावरे, नवनाथ आंधळे,अनिकेत घुले, आदींसह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात विविध घोषणा देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
चौकट
राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख – डॉ. तांबे
राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे भारताची जगात ओळख झाली आहे लोकशाहीला ताकद देणाऱ्या पुरोगामी विचारांचे असणाऱ्या गांधीजींनी सातत्याने देशाच्या एकात्मतेसाठी काम केले असून पुढील पिढ्यांना विचार दिली आहे त्यांच्याच विचारावर देशाची वाटचाल सुरू असून काही विकृत प्रवृत्ती कडून होणाऱ्या या अवमान कारक वक्तव्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे अशी आग्रही मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
