राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील अडचणी दूर होऊन सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदावे, राज्यातील दुष्काळाचे संकट लवकर दूर व्हावे अशी प्रार्थना आमदार अमोल खताळ यांनी शनिदेवाच्या चरणी केली.
शनिशिंगणापूर येथे शनि अमावस्येनिमित्त आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते शनिदेवाची विधिवत महापूजा करण्यात आली. यानंतर दोन्ही आमदारांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. यावेळी त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
आमदार खताळ म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांसमोर शेतीतील विविध संकटे उभी राहत असून, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या जीवनात स्थैर्य निर्माण व्हावे, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळावे आणि प्रत्येक कुटुंबात सुख-समाधान नांदावे,
समाजातील प्रत्येक घटकाला सुखाचे दिवस अनुभवता यावेत, नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे आणि राज्याची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी शनिदेवाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी आशीर्वाद घेत प्रार्थना केली शनि अमावस्येच्या निमित्ताने शनिशिंगणापूर येथे धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या पूजाविधीत दोन्ही आमदारांनी सहभागी होत शनिदेवाचे दर्शन घेतले.