खराडी येथे मंदिरासमोर सभामंडप उभारणार

 

संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील ज्या मंदिरांना सभामंडप नाही, अशा मंदिरांना सभामंडप उपलब्ध करून देण्याचे काम तुमच्या आशीर्वादाने करत आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुढील वर्षापर्यंत खराडी येथील मंदिरासमोर सभामंडप उभारण्यात येईल. असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिला.

तालुक्यातील खराडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित श्री भवानी (जगदंबा) मातेच्या भव्य ज्योत सोहळ्यात आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी उपस्थित राहून मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते विधिवत महाआरती करण्यात आली. या सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले, गावातील विकासकामांबाबत तुम्ही काळजी करू नका. विकासकामांसाठी मी कुठेही कमी पडणार नाही. धार्मिक कार्यासाठीही माझे सहकार्य कायम राहील. रस्त्यांच्या कामांसाठी निधीची गरज असेल आणि काही अडचण नसेल, तर त्यासाठीही निधी उपलब्ध करून देईन. गेल्या दीड वर्षात प्रत्येक गावाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक तेवढ्या निधीची मागणी करा, मी निधी कमी पडू देणार नाही.

दरम्यान, गुजरातमधील शक्तिपीठावरून खराडी येथे आणण्यात आलेल्या पवित्र ज्योतीचे आमदार खताळ यांनी दर्शन घेतले. त्यानंतर ते भाविक आणि ग्रामस्थांसोबत ज्योत मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.


ज्योत सोहळा आणि महाआरतीमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक धार्मिक विधी, मातेच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि भाविकांचा उत्साह यामुळे सोहळ्याला विशेष रंगत आली. आमदार खताळ यांच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्येही उत्साह दिसून आला. गावातील तरुणांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. धार्मिक श्रद्धा, भक्तिभाव आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागात खराडी येथील भवानी मातेचा ज्योत सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी महायुतीचे गोकुळ दिघे,पंकज मोरे, बाळासाहेब शिंदे, संजय साबळे,विलास मोरे, संकेत खुळे सचिन पावबाके रमेश साबळे जयराम खर्डे सर,सुभाष साबळे,सचिन धुमाळ, रवी मोरे, परशुराम काळे ,युवराज वाघशुभम राहणे,शैलेंद्र वाघ,सतीश पर्बत,सागर पर्बत, आबासाहेब वाघ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *