संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्ताने सामाजिक उपक्रम म्हणून शालेय विदयार्थ्याना शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले .
भारतीय लहुजी सेना व आण्णा भाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने ग्रामपचायत समोरील प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून १२३ वी जयंती साजरी करण्यात आली इतर खर्चाला आळा देवून सामाजिक उपक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबर खाऊचे वाटप करण्यात आले .
यावेळी संरपच सतिष जोशी , उपसंरपच सुनिल जोशी , आण्णा भाऊ साठे मित्र मंडळाचे अध्यक्ष भारत साळवे , उपाध्यक्ष रविंद्र साळवे , लहुजी सेना अध्यक्ष दगडू साळवे , संतोष भडकवाड , अहिल्यादेवी पतसंस्थेचे संचालक सिताराम साळवे , सोसायटी संचालक मनोहर जोशी , जनसेवा कार्यालयाचे आधिकारी डॉ संजय कहार , जेष्ठ नेते नारायण काका कहार , गणेश जोरी , आण्णा गेणू जोशी , ग्रामसेवक भारत सोनवणे , विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे कार्यकर्ते सागर राझे , विकास भडकवाड , भानुदास ससाणे , शाहिर कांबळे , भाऊसाहेब आव्हाड , योगेश साळवे , दिपक साळवे , नितिन साळवे , मिनानाथ साळवे , मच्छिद्र साळवे , अनिल साळवे , निलेश राझे , अमोल साळवे , झानेश्वर साळवे , आण्णा साळवे , संदिप साळवे , किशोर जोशी , सचिन आव्हाड आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब जमधडे यांनी केले
Post Views: 578
