शिर्डी । झुंजार न्यूज
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ सूजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महिलाकरिता ” भक्तीपिठ ते शक्तीपिठ ” ही आनंदीमय दर्शन सोहळयाचा शिर्डी मतदार संघातील हजारो महिला रोज अनुभवत असून ग्रामिण महिलाच्या चेहऱ्यांवर भक्तीमय आनंद केवळ प्रवरा पॅटर्नमुळेचं दिसू लागला आहे
रोजच्या जीवनातील प्रपंच्यामधून महिलेला वेळ मिळत नसल्याने सातत्याने राब – राबणाऱ्या ग्रामिण महिलेला एक प्रकारे समुह दर्शन घडावे म्हणून शिर्डी विधानसभा मतदार संघातील महिलांकरिता डॉ सुजय विखे पाटील यांनी भक्तीपिठ ते शक्तीपिठ योजना आखून पंढरपूर व तुळजापूर दर्शनावारी घडवून आणण्याचे ध्येय ठेवले त्यातून जनसेवा कार्यालयासह विविध संस्थेतील कर्मचारी व कार्यकर्त्याचे मोठे सहकार्य मिळू लागले .

गेल्या अनेक दिवसापासून गांव ते पंढरपुर , तुळजापूर असा दोन दिवशीय दर्शन सोहळा असल्याने रोज शिर्डी मतदार संघातुन १३०० ते १४०० महिला दर्शनाकरिता जात आहे . आनंदीमय वातावरणात घरापासून पहाटे निघणारी महिलेची सर्व काळजी घेतली जाते सकाळी ७ ते ८ वाजता पाणी बॉटल व नाष्टा , दुपारी जेवन तर ३ वाजता पंढरपुरमध्ये पोहचल्यानंतर पंढरपुर येथे उभारलेल्या स्व.पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील स्मृती मंडळाच्या माध्यमातून व पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती वैष्णव सदन महिलाची आराम , राहणे व जेवनाची सुविधा केलेली आहे . तर दुसर्या दिवशी हाटे उठून शक्तीपिठ म्हणजे तुळजापूरच्या दर्शनाकरिता महिला आनंदीमय वातावरणातून जातात या दोन दिवशीय दर्शनवारीचा व सुविधेचा लाभ महिलांना चांगल्या प्रकारे होत असल्याचा प्रत्येय भक्तीपिठ ते शक्तीपिठ दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या महिलांना येत असल्याचे होणार्या चर्चामधून दिसत आहे.
भजन , भक्ती गीतेच्या तालावर ठेका धरत महिला आनंद घेवून दर्शनवारी करीत आहेत. या सर्व महिलांची विचारपूस करण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील पंढरपुरमध्ये ऑनलाईन येवून महिलांशी संवाद साधत प्रवास कसा झाला , मनोभावे दर्शन करा दर्शनवारीचा आनंद घ्या असे सांगतात अनेक महिलांनी डॉ.विखे पाटील यांच्या आपुलकीने कौतूक करत , विखे पाटील परिवारानी महिलांप्रती दर्शनवारीचा घडून आणलेल्या योगदानाबद्दल महिलांकडून स्तुतिसुमन व समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे .
चौकट – १
ग्रामिण भागातील काबड – कष्ट करणारी महिला ही आपली मिळणारी तुटपुंजी संसाराकरिता लावता – लावता जीवन वेचते शिल्लक काही राहत नसल्याने पंढरपुर – तुळजापुरला दर्शनाला कधी येणार ? मात्र विखे पाटील परिवाराने ही संधी उपलब्ध करुन दिल्याने खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व गरिबांचे हेच विठठल आहेत .
दर्शनवारीतील एक महिला ( पानोडी )
चौकट – २
दोन दिवशीय दर्शनवारी मधील महिलांची सुसज्य व्यवस्था ठेवण्यात आली ए सी लक्झरी , वेगवेगळ्या पदार्थाचे जेवन , राहण्याची सूसज्य व्यवस्था करत देव दर्शन घडवून शेवटी पंढरपुर – तुळजापुर देवाचे प्रतिमा देवून महिलांना सुखरुप घरी पोहच केले जात आहे .
