संगमनेर । झुंजार न्यूज

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात विद्यालय शेडगाव येथील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेला भूषण आंधळे याने फेकी प्रकारात यश संपादन केले. ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर येथे तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत भूषण गोविंद 14 वयोगट गोळा फेक क्रीडा प्रकारात प्रथम तर थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये या खेळाडूची निवड झालेली आहे तसेच तो संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.

विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब संस्थेचे चेअरमन मा.आमदार डॉ. सुधीर तांबेसाहेब तसेच सह सेक्रेटरी श्री.दत्तात्रय चासकर रजिस्टार श्री.बी. आर गवांदे सर स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री.नारायण दादा नागरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी सोसे सर मार्गदर्शन करणारे श्री शंकर हाळनर सर शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी व गावकऱ्यांनी तसेच संस्थेचे अधिकारी पदाधिकारी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed