संगमनेर । झुंजार न्यूज
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येणाऱ्या निवडणुका , धनगर आरक्षण व पक्ष वाढीकरिता राज्यात संपर्क अभियान सुरु केल्याने माजी मंत्री महादेव जानकर यांनी संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागातील संपर्क दौऱ्यात शिबलापूर येथे आले असता त्यांचे मोठ्या उत्साहात कार्यकर्त्या कडून स्वागत करण्यात आले .
यावेळी महादेव जानकर यांनी लोकांशी अत्यंत अस्तेने संवाद साधत त्यांच्याशी हिंतगुंज करत त्याचा सत्कार स्विकारला . आपल्या कार्यकर्त्यांना पक्ष वाढीकरिता काम करा . आता संपूर्ण राज्यासह देशात पक्ष मजबूत करायचा असून सत्तेच्या केंद्रस्थानी राहून समाज्याचे प्रश्न व अडी अडचणी दूर करायचा आहे असा सल्ला दिला आहे .
यावेळी माजी संरपच दिलावरभाई शेख , संरपच प्रमोद बोंद्रे , साहेबराव रक्टे , युनुसभाई सय्यद , रमेश मुन्तोडे , डॉ सुरेश वडीतके , राजेंद्र नागरे , पंढरीनाथ नागरे ,संदीप बोंद्रे, राजेंद्र बोंद्रे ,ज्ञानेश्वर रकटे, वसंत मुन्तोडे, बाळासाहेब थोरात , बाळासाहेब रक्टे , नवनाथ नागरे यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते
Post Views: 869
