संगमनेर । झुंजार न्यूज
सुसंस्कृत व प्रगतशील संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक या हॅपी हायवे चे लोकार्पण गणेश उत्सवाच्या आनंदी काळात मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वा. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात मा.आ.डॉ सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सौ.तांबे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून व मार्गदर्शन इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक हा मॉडेल रस्ता तयार झाला आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणासह दुतर्फा पादचारी मार्ग आहेत. मध्यभागी डिव्हायडर सह विविध वृक्षांचे रोपण केले असून या पूर्ण रस्त्यावरती विद्युतीकरण झाल्याने लखलखाट होणार आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरात बायपास, हायटेक बस स्थानक, विविध वैभवशाली इमारती, शहरासाठी 24 तास मुबलक व स्वच्छ पाणी, समृद्ध बाजारपेठ, शैक्षणिक वातावरण,सांस्कृतिक परंपरा,सुरक्षितता,स्वच्छता याचबरोबर स्वच्छ व सुंदर हरित संगमनेर या संकल्पनेमुळे संगमनेर शहर हे वैभवशाली ठरली आहे. यात नव्या हॅपी हायवेमुळे शहराची सुंदरता अजून वाढणार आहे.
मंगळवारी 5 वा.या हायवेचे लोकार्पण होणार असून यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रोषणाई करण्यात येणार आहे. फुलांच्या सजावटीसह विद्युतीकरण,झुम्बा डान्स, रांगोळीच्या सजावटी, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आनंदी यात्रा, आरसचे विविध देखावे यामुळे हा हॅप्पी हायवेचा सोहळा दिमाखदार होणार आहे.
तरी या हॅपी हायवे सोहळा लोकार्पण कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व नागरिक बंधू – भगिनी जनता यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हॅपी हायवे सोहळा संयोजन समितीने केली आहे
