संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील डिग्रस येथील जनसेवा विकास मंडळाचे कार्यकर्ते अशोकराव रखमाजी खेमनर यांनी ९ पैकी ५ मते घेवून संरपचपदी निवड झाली . 
२०२२ ला झालेल्या ग्रामपचायत निवडणुकीत राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कै रखमाजी खेमनर यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा विकास मंडळाने दणदणीत विजय मिळवून सत्ता हस्तगत केली त्यावेळी कै रखमाजी खेमनर हे संरपच झाले मात्र आठ महीन्यातचं त्यांचे दुदैवी निधन झाले . त्यांच्या जागेवर त्यांच्या अशोक खेमनर या मुलांला बिनविरोध सदस्य म्हणून निवडून दिले . मात्र संरपच पद अनेक दिवस रिक्त असल्याने शासनाच्या आदेशावरुन संरपच पदाची निवडणुक घेण्यात आली .
या संरपचपदी निवडणुकीकरिता जनसेवा विकास मंडळाकडून अशोक खेमनर तर शेतकरी विकास मंडळा कडून गोरक्ष होडगर यांनी उमेदवारी अर्ज दाखले केले . संरपच पदाकरिता चिठ्ठी पद्धतीने मतदान होवून झालेल्या मतदानात अशोक खेमनर यांना ५ तर गोरक्ष होडगर यांना २ मते पडल्याने खेमनरचा विजय निश्चित झाला या मतदान प्रक्रियेत सर्व सदस्य उपस्थित होते . 
यावेळी महसूल ना राधाकृष्ण विखे पाटील , डॉ सुजय विखे पाटील , सौ शालिनीताई विखे पाटील , संदिपराव घुगे आदींनी अभिनंदन केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed