संगमनेर । झुंजार न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांना पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदार संघ अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडण्यापूर्वी कपिल पवार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. पक्षात दोन गट पडल्यावर त्यांनी अजित पवार यांच्या समवेत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी त्यांना अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद दिले. आता त्यांच्यावर शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोपविली आहे. या संदर्भातील नियुक्तीपत्र त्यांनी आज दिले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगनराव भुजबळ, आमदार किरण लहामटे आदी उपस्थित होते.
