संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व व पठार भागाच्या माळरानावरील कौठे – मलकापूर येथील उभारलेल्या श्री गजानन महाराज साखर कारखान्याचा 2023 – 2024 चा 7 वा गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दि 3 नोव्हेबर 2023 रोजी दुपारी 11.30 वा संस्थापक अध्यक्ष रविंद्र बिरोले व सौ अश्विनीताई बिरोले यांच्या हस्ते संप्रन्न होणार असल्याची माहिती व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक यांनी दिली .
संगमनेर तालुक्यातील पठार भागाला वरदान ठरलेल्या कौठे – मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड ( भक्तनगर ) या कारखान्याच्या2023 – 24 चा 7 वा गळीत हगांम शुक्रवार दि 3 नोव्हेबर रोज होत असून गेल्या 6 वर्षाचा गळीप हंगाम अनेक समस्यावर मात करत अध्यक्ष रविंद्र बिरोले व कारखाना व्यवस्थापकांनी यशस्वीरीत्यापणे केले आहे .
या कार्यक्रमास संचालिका सौ अश्विनीताई बिरोले , शंतनू बिरोले , नंदन बिरोले , सौ ईशाताई बिरोले , अॅड रामदास शेजूळ , हरिभाऊ गीते , सुभाष कोळसे , केरुबापू मगर , एकनाथ नागरे , जनरल मॅनेजर बी एन पवार , बाळासाहेब खेमनर , तानाजी बागुल कोकणे सर , दिलीप पोटे , कैलास डोंगरे , भास्कर गाडे , गुलाब भोसले , नवनाथ ढेबरे , सचिन देशमाने , डहाळे , वाकचौरे , जाधव , फारुकी , आदिसह ऊस उत्पादक , सभासद , वहातुकदार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहे .
चौकट
2023 – 24 चा गळीत हंगाम हा कमी पाऊस , कमी ऊस यामुळे अडचणीचा असला तरी ऊस उत्पादकांचा विश्वास ; भरोसामुळे हा हंगामा यशस्वी करणार
रविंद्र बिरोले ( संस्थापक अध्यक्ष , श्री गजानन महाराज साखर कारखाना )
