संगमनेर । झुंजार न्यूज   

 शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील राजकिय दृष्टया महत्वाच्या असणाऱ्या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत महसुलमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आपला गड राखत संरपचासह दहा जागांवर दणदणीत विजय मिळविला तर प्रतिस्पर्धी असणार्‍या अपक्ष उमेदवारां बरोबर काटे की टक्कर झाल्याने अवघ्या ४६ मताने सौ अलकाताई बापूसाहेब गायकवाड लोकनियुक्त संरपचपदी म्हणून निवडून आल्या .

 या निवडणुकीत आजी – माजी महसूलमंत्री  यांच्या कार्यकर्त्यां समोरा – समोर येत निवडणुक प्रतिष्ठेची केली त्यात ‘ अपक्ष उमेदवारी राहिल्याने तिरंगी रंगत झाली . या निवडणुकीत आजी – माजी महसूल मंत्र्याच्या कार्यकर्त्याचे दाबे दणाणले मात्र मतदारांनी सुद्धा अपक्षांला आकडेवारीनुसार पसंती दिल्याचे दिसले मात्र अवघ्या ४६ मताने विखेचा गड अबाधित राहिला . गेल्या ५० वर्षापासून विखे भोवती गांवाचे राजकारण फिरत असताना अपक्षाला मोठया प्रमाणात मतदान होणे ही विखेना चिंतेची बाब आहे . तरी निष्टता विजय झाला हे निश्चित सत्ता अबाधित राहिली . या निवडणुकीकडे तालुक्याचे नव्हे तर जिल्हयाचे लक्ष लागले होते .

झालेल्या सरपंच पदासाठीच्या रंगतदार लढतीत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्विय सहायक बापूसाहेब गायकवाड यांच्या पत्नी सौ. अलका बापूसाहेब गायकवाड (१ हजार १६५ मते) या विजयी झाल्यामुळे आ. थोरात गटाच्या सौ. ‌शालिनी दत्तात्रय सोनवणे (३८९ मते) व अपक्ष उमेदवार सौ. सोनाली मोहित गायकवाड (१ हजार ११९ मते) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर याठिकाणी १६ मते ही नोटाला मिळाली आहेत.

आश्वी खुर्द करिता लोकनियुक्त सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने विखे गटाकडून सौ. अलका बापूसाहेब गायकवाड तर थोरात गटाकडून सौ. शालिनी दत्तात्रय सोनवणे या रिंगणात उतरले तर सौ. सोनाली मोहित गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुक रंगत आली होती . सरपंच पदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरल्याचे चित्र दिसले . तिरंगी लढतीत विखे पाटील गटाच्या सौ अलकाताई बापूसाहेब यांनी बाजी मारत त्या लोकनियुक्त सरपंच पहिल्या महीला ठरल्या . तर

प्रभाग १ :- सुवर्णा राजेंद्र सातपुते , कल्पना सचिन क्षिरसागर 

प्रभाग २ :- सागर दिनकर भडकवाड , विठ्ठल बजाबा गायकवाड , गुलनाज कमल सय्यद

प्रभाग ३ :- जनाबाई देवराव शिंदे , सौ. आशा बंडु मुन्तोडे ,

प्रभाग ४ :- बाबासाहेब प्रताप भवर , सोपान मधुकर सोनवणे , संगिता दत्तात्रय बर्डे  तर थोरात गटाचे एकमेव संजय गबाजी भोसले हे निवडून आले .

चौकट
गेल्या ५० वर्षाच्या कालखंडात प्रवरा ४० अंतर्गत असणार्‍या आश्वी खुर्द हे गांव विखे पाटील यांचे बाल्लेकिल्ला समजले जाते तेथेचं थोरात गटाने सुरुंग लावत प्रवेश केला तर संरपचपदाकरिता झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सौ सोनाली मोहीत गायकवाड यांनी १११९ मते घेवून प्रतिस्पर्धीयांना दमछाक आणला विजयी उमेदवार सौ अलकाताई बापूसाहेब गायकवाड ११६५ मते घेवून विजयी झाल्या .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *