संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदारसंघातील अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या आश्वी बु ॥ ग्रामपंचायत निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्विय सहायकानी आपला दुसऱ्यांदा गड राखल. झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीत थोरात गटाचे संरपचासह १५ जागांपैकी सदंस्य पदाचे ९ व विखे पाटील गटाचे ६ उमेदवार विजयी झाले तर थोरात गटाकडून निवडून आलेले नामदेव शिंदे यांचे भाग्य उजळले पाणी पुरवठा कर्मचारी ते लोकनियुक्त संरपच होण्याचा मान राखला .
आश्वी बुद्रक येथे झालेल्या अटीतटीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांचे स्विय सहायक विजय हिंगे यांनी ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी नामदेव किसन शिंदे (२ हजार ३४ मते) यांना निवडून आणल्यामुळे ना. विखे गटाचे रविंद्र सुभाष बर्डे (२ हजार २२ मते) व अपक्ष उमेदवार तान्हाजी रघुनाथ नांगरे (१२४ मते) हे पराभूत झाले आहेत तर याठिकाणी २७ मते हे नोटाला मिळाली आहेत.

दरम्यान आश्वी बुद्रक येथे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आ. थोरात गटाने विजयी संपादन केल्याने गावांमध्ये विजयी झालेल्या सरपंच व सदंस्य पदाच्या उमेदवाराची फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली असून गाव विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विजयी उमेदवारानी दिली .
आश्वी बुद्रक ग्रामपंचायत येथिल विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-
प्रभाग क्रमांक १ मधून :- अझरुद्दीन सिकंदर शेख (३०८ मते), जयश्री विजय केदारी (३९८ मते), अरुणा विजय उर्फ पांडुरंग हिंगे (४१२ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक २ मधून :- भाऊसाहेब तात्यासाहेब खेमनर (४९१ मते), मीना आंतोन गायकवाड (४५९ मते), सारीका विशाल पाटील (४१७ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधून :- अनिल राधाकिसन कगंणकर (६७६ मते), बाळासाहेब नानासाहेब मदने (५७२), बिजयाबाई भास्कर मोरे (५८१ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ४ मधून :- अविनाश गिताराम गायकवाड (४९२ मते), बबनराव भाऊराया शिंदे (४३९ मते), पुजा राहुल राखपसरे (४२९ मते) विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ५ मधून :- अभिजित शंकर ताजणे (३९५ मते), दर्शना संतोष ताजणे (४१६ मते), परीगा बाबासाहेब गायकवाड (३९७ मते) विजयी झाले आहेत.
