संगमनेर । झुंजार न्यूज

शिर्डी मतदार संघ हे आमचे कुटुंब आहे, संकटात आणि आनंदात विखे पाटील कुटुंब हे सातत्याने आपल्या सोबत आहे. गोरगरीब जनतेला आधार देणे हाचं विखे कुटुंबाचा वारसा असून तो कायम जतन करण्‍याची पंरपरा आमची चौथी पिढी ही पुढे घेवून जात असल्‍याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
शिर्डी मतदार संघातील जोर्वे गटातील पानोडी , शिबलापूर , पिंप्री लौकी अजमपूर, हंगेवाडी या गावांमध्‍ये विखे पाटील कुटूंबियांच्‍या वतीने दिवाळी सणाचे औचित्‍य साधून साखर वितरण सुरु करण्‍यात आले आहे. पानोडी येथे झालेल्या कार्यक्रमात सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या . तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण हे होते .
यावेळी माजी उपसंरपच अशोकराव तळेकर , रावसाहेब घुगे , राजेंद्र जाधव , बाळासाहेब कदम , रामनाथ पवार , नय्युम सय्यद , पांडूरंग सांगळे , जीवन कदम , दिपक जाधव , नानासाहेब तळेकर , सुभाष पवार , आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी सौ विखे पाटील पुढे म्हणाल्या की , स्वत:साठी जगतांना इतरासाठीही जगून काम करण्याचे संस्कार पद्मश्रींनी दिले. सहकार चळवळीच्‍या माध्‍यमातून सामाजिक बांधिलकी जोपासतानाच ग्रामीण भागातील प्रत्‍येक माणसाला विकासाच्‍या प्रवाहात सहभागी करुन घेण्‍याचे काम लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. हीच परंपरा आमची चौथी पिढी पुढे घेवून जात आहेत. आपल्‍या  सर्वांच्‍या आशिर्वादाने विविध पदांवर काम करण्‍याची मिळणारी संधी ही सामाजिक बांधिलकीत कशी उतरविता येईल हा प्रयत्‍न आमचा असतो. यामुळे वेगवेगळे उपक्रम मतदार संघातील नागरीकांसाठी आयोजित केले जात असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
कोव्‍हीड संकटातही जनतेच्‍या सोबत विखे पाटील कुटूंबिय कायमच राहीले. कोणत्‍याही सुखदुखात जनतेला साथ देण्‍याची भूमिका कायम ठेवल्‍यानेच जनतेची साथही आम्‍हाला वेळोवेळी मिळत आहे असे स्‍पष्‍ट करुन, सौ.विखे पाटील म्‍हणाल्‍या की, कोविड काळात मोफत दिलेले उपचार, सिंधु अन्न छञ, वयोवृद्ध नागरीकांसाठी राबविण्यात आलेली वयोश्री योजना तसेच वैयक्तीक लाभाच्‍या योजनेचा फायदा यामुळे  सर्वानाच मोठा आधार मिळत असल्‍याचे त्‍यांनी यावेळी नमुद केले.
चौकट 
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोर गरिब लोकाकरिता आयुष्यमान भारत , मोफत अन्न धान्य , घरकुल या सारख्या असंख्य योजना आमलात आणल्या . ऐतिहासिक असे श्री राम मंदिर देशात झाल्याने आपल्या सर्वाना तेथे जाण्याचा योग निश्चित येणार आहे 
सौ शालिनीताई विखे पाटील ( माजी अध्यक्षा जि . प . नगर ) 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *