संगमनेर । झुंजार न्यूज 

शिर्डी विधानसभा मतदार संघातील पिंप्री लौकी अजमपूर ( पिंप्री फाटा ) येथील महालक्ष्मी दुध उत्पादक व प्रक्रिया केंद्र या संस्थेने दुध उत्पादक सभासदांना दिपावली सणानिमित्ताने दिपावली रिबेट ४ रु .५० पैसै प्रति लिटर व किराणा बाजार व फराळाचे वाटप करण्यात आले 
गेल्या २० वर्षापासून महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जनसेवा मंडळाचे अध्यक्ष श्री भारतराव पाटील गिते यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन श्री रमेशशेठ गिते प्रयत्नाने महालक्ष्मी दूध संस्थांने कमी कालावधीतचं दूध उत्पादकांचा विश्वासर्हता निर्माण केला . दर्जदारपणा स्वच्छ व प्रामाणिक वाटचालीतून दूध उत्पादकांचा आर्थिक लाभ होत आहे . परापंरानुसार दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट + किराणा देवून दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे .  
सर्व सभासदांना संस्थेतून किराणा मालाचे वाटप करण्यात आले .यावेळी कैलासराव गायकवाड , म्हस्के भाऊ , ह भ प सातपुते महाराज , डॉ रंगनाथ गिते , सुरेशराव मुंढे , पांडुरंग गिते , सचिव अशोकराव दराडी , चंद्रभान गिते , सर्जेराव घुगे , विलास गिते , आनंदा दराडे , अशोक कुंटे , सतिश घुगे , सोमनाथ दातारी ,  आंबा लबडे ,  कारभारी दराडे , वैभव ‌‌गाडे , कूनाल तक्ते , बाळासाहेब ‌वाघ‌ , किरण‌ सांगळे आदीसह मोठ्या संख्येने दूध उत्पादक उपस्थित होते . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *