लोणी । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील लोणी येथील माळी वस्ती येथे रविवार दिनांक 19 /11 /2023 रोजी सकाळी11:00 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एकलव्य आदिवासी बहुजन पक्षाच्या वतीने जाहीर बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली .
या बैठकीत आदिवासींचे जीवनामध्ये असा भूकंप येत आहे की आदिवासी समाजाचे आरक्षण वर इतरांना आदिवासी समाजाच्या आमच्या ताटात तुप दिसत आहे का आत्तापर्यंत बोगस आदिवासी कितीतरी नोकऱ्यांवर रुजू असताना आपण काही हालचाल करत नाही त्यामुळे इतरांनी त्याचा गैरफायदा घेतला आहेत त्यामुळे आदिवासी मुलांना व मुलींना नोकरी पासून वंचित राहिले त्यामुळे आत्ता जागे व्हा इतर समाज आपल्या आरक्षण वर डोळा ठेवला आहेत त्याकरता प्रत्युत्तर देण्याकरता सर्व आदिवासी बंधू आणि भगिनी व युवक आता रस्त्यावर उतरायची गरज आहे याची सर्वांनी दखल घेतली पाहिजे आता वेळ आहेत वेळ हातातून गेली तर हातात काहीच राहणार नाही संघ सर्वपक्ष संघटना सर्वांनी एकत्र येऊन विचार मायमे करून योग्य आशा आणि दिशा देण्याकरता सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सन्माननीय वरिष्ठ गावातील सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून आरक्षण संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे मीटिंग बदलायचे कारण की मराठा आरक्षण चे वातावरणानुसार मीटिंग चेंज मीटिंग चे ठिकाण चेंज झाले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी वरील ठिकाणी उपस्थित राहावे
