संगमनेर । झुंजार न्यूज

महाराष्ट्रासह देशभर प्रतिष्ठीत असलेला स्वातंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात व हरित क्रांती जनक आण्णासाहेब शिंदे यांच्या स्मृती पुरस्कार हा प्रेरणादिन २०२४ म्हणून या पुरस्काराने  शेती ,उद्योग व सहकार क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जातो यातील शेती निगडीत असणार्‍या उदयोग क्षेत्रातील जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचा गौरव करण्यात आला.
महाराष्ट्राचे मानबिंदू असलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळा संगमनेर येथील जानता राजा मैदान येथे रविवारी संपन्न झाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री . सिद्धरामय्या जी यांच्या हस्ते तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण , महाराष्ट् कॉग्रेस प्रभारी श्री रमेश चेन्नीथला जी , कर्नाटक मंत्री श्री एच के पाटील , माजी मंत्री आ बाळासाहेब थोरात , माजी मंत्री आ जितेंद्र आव्हाड , माजी मंत्री भास्करराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
यावेळी माजी आमदार डॉ सुधीर तांबे , आ विश्वजीत कदम , आ सत्यजीत तांबे , आ लहू कानडे , आ शोभा बच्छाव ,   यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रेरणा दिन म्हणून हा पुरस्कार सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना  प्रदान करण्यात येतो. यंदाही महाराष्ट्रासह देशातही ज्यांच्या कार्याची दखल घेतली जात आहे अश्या व्यक्तीमत्वांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जैन इरिगेशन कंपनीची सहा दशकांपूर्वी ७००० रुपयांच्या बीज भांडवलातून सुरुवात झाली. आज जवळपास ८००० कोटींच्या वार्षिक उलाढालीचा आलेख कंपनीने उंचावला आहे. जगभरात ३३ कारखाने, ६५ एजन्सी , १४५ हून अधिक देशात निर्यात, ११००० च्यावर सहकारी ही कंपनीची बलस्थानं आहेत. यातूनच लाखो शेतकऱ्यांच्या जीवनमानात सर्वांगीण बदल कंपनीने घडवले. पाणी बचतीसह, शेत, शेतकरी यांचा विकास हेच जीवन-लक्ष्य केंद्रस्थानी ठेवत कंपनी व्रतस्थपणे कार्य करीत आहे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोलाची भूमिका जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनी निभावत आहे. या अतुलनीय कामागिरीला अधोरेखित करत श्री. अशोक जैन यांना सन्मानीत करण्यात आले आहे .
श्री भवरलाल जैन , सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात , आण्णासाहेब शिंदे , डॉ आण्णासाहेब पवार यांची चांगली मैत्री होती . शेती , सहकार व शेती . उपयोगी उद्योजक हे भाऊसाहेब थोरात यांचे धोरण होते त्यानुसार शिस्त , काटकसर , करारीबाणा हा स्वभाव असल्याने भवरलाल त्यांची मैत्री झाली आण्णासाहेब शिंदे प्रमाणेचं शेतकरी व शेती विषयी भवरलाल यांची तळमळ असल्याने दोघे ही वकील होते . भाऊसाहेब थोरात यांनी सातत्याने शेती व शेतकऱ्यांच्या फायदयाकरिता भरीव काम केले . त्यामुळे संगमनेर हे दुष्काळी पट्टयातील असणारा तालुका आज शेती , सहकार , उदयोग , व्यापार , आर्थिक क्षेत्रात राज्यात नव्हे तर देशात अग्रेसर तालुका म्हणून परिचित असल्याच्या आपल्या भावना अशोक जैन यांनी मांडल्या .
हा मला मिळालेला पुरस्कार माझ्या शेतकरी बांधवांना , माझ्या सहकाऱ्यांना अर्पण करत पुरस्कारातून मिळालेली एक लाख रुपयेच्या रक्कमेत अजून माझ्या कंपनीकडून दहा लाख देत अकरा लाख रुपये शेतकर्‍यांच्या कल्याणकारी योजनेकरिता आ बाळासाहेब थोरात यांना देतो 
श्री .अशोक जैन ( अध्यक्ष : जैन इरिगेशन सिस्टिम्स लि . जळगांव )
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *