संगमनेर । झुंजार न्यूज

 अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम.बी.ए. विभागात शिकत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना कॅम्प सप्लेसमेंट मुलाखती अंतर्गत विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांकडून नोकरीची संधी तसेच प्रथम वर्षातील मुलांना त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांना इंटर्नशिप करण्याची संधी कंपन्यांनी दिली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .ए. वेंकटेश यांनी दिली.

चालू शैक्षणिक वर्षात बजाज फायनान्स लि, डीसीबी बँक लि., स्वर्ण प्रगती हाऊसिंग मायक्रोफायनान्स प्रायव्हेट लि, इंडिया मार्ट ,पिंक्लिक,केअर हेल्थ इन्शुरन्स , एच डी एफ सी बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. या मल्टिनॅशनल कंपन्यांकडून नुकताच प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आला असून एकूण प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थ्यांना बजाज फायनान्स लि. कडून विद्यार्थ्यांना वार्षिक ५. ६८ लाखचे पॅकेज मिळालेले आहे. व विद्यार्थ्यांना सरासरी चार लाखाचे वार्षिक पॅकेज मिळालेले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकता कौशल्य वाढवण्यासाठी कॉलेज मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नुकतेच क्लास रूम लर्निंग टूप्रॅक्टिकल लर्निंगद्वारे मुलांना बाहेरील औद्योगिक जगातील प्रॅक्टिकल एक्स प्लोजर मिळण्यासाठी फिल्डवर ती पाठवले जाते त्या अनुषंगाने नुकतेच संगमनेर मध्ये“ बिझनेस एक्सपो फुलझडी” मध्ये मोठ्या संख्येने मुलांनी सहभाग नोंदवला व विविध प्रकारचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले तसेच “ उन्नत भारत अभियान”अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध ग्रामीण भागात फिल्डवर ती जाऊन सर्वेकेला. त्याच प्रमाणे कॉलेज मध्ये येणाऱ्या कंपन्यांचा कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया मधिल नियोजन हे प्रथम वर्षातील मुलांकडून करून घेतले जाते. या उपक्रमातून त्यांचे कौशल्य व आत्मविश्वास वाढत आहे. आणि त्या अनुषंगाने कंपन्या त्यांना इंटर्नशिप करण्याची संधी देत आहेत. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयात विविध प्रशिक्षण शिबिर, औद्योगिक अभिमुख अभ्यासक्रम, औद्योगिक स्थळांचे अभ्यास दौरे, व्हॅल्यू ॲडिशनल कोर्सेस, इंडस्ट्रीइंटरॅक्शन्स, फिल्ड व्हिजिट्स यांसारखे विविध ऍक्टिव्हिटी सातत्याने राबवल्या जातात, त्यांच्यात असलेला आत्मविश्वास वाढवून वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत कंपन्यांकडून प्लेसमेंट संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महाविद्यालय व कंपन्यांशी संवाद साधून औद्योगिक जगातील अपेक्षा विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेणे यासाठी महाविद्यालयातील ट्रेनिंग व प्लेसमेंट समन्वयक प्राध्यापक पी.बी. वाकचौरे आणि डॉ. एस .डी खर्डे हे विशेष प्रयत्न करत आहेत. तसेच येणाऱ्या काळात अनेक कंपन्यांशी संपर्क साधून कॅम्पस ड्राईव्हचे नियोजन करण्यात आलेले आहे.

या निवडीबद्दल या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे,विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,मॅनेजर प्रा धुमाळ, प्राचार्य डॉक्टर एम ए वेंकटेश, डॉ प्रा. वृषाली साबळे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *